नोंदणी अद्ययावत न केल्यास मतदानाचा हक्क जाणार
एमएमसीचा डॉक्टरांना इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : महाराष्ट्रातील डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) स्पष्ट शब्दांत सांगितले, आहे की नोंदणीची माहिती अद्ययावत नसेल तर डॉक्टरांना आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळणार नाही. २३ जानेवारीपर्यंत नोंदणी, नूतनीकरण आणि दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले असून, मुदतीनंतर उशीर करणाऱ्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार आहेत. ही कडक कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लागू करण्यात आली असून, कोणतीही शिथिलता करण्यात येणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि १४ जानेवारी दिलेल्या निर्देशांच्या अनुपालनात एमएमसी निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एमएमसीनुसार सर्व अर्ज ऑनलाइन पोर्टलद्वारे सादर करणे आवश्यक आहे. निर्धारित शुल्क भरल्यानंतर संबंधित कागदपत्रांच्या हार्ड कॉपी २३ जानेवारीपर्यंत एमएमसी कार्यालयात पोहोचणे बंधनकारक आहे. निर्धारित कालमर्यादेत प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या डॉक्टरांची नावे एमएमसी नोंदवहीत वैध मानली जाणार नाहीत आणि अशी नावे मतदार यादीतून काढून टाकली जातील. ही कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात येत आहे.
...
पात्र डॉक्टरांना आवाहन
जे पात्र डॉक्टर अद्याप एमएमसीमध्ये नोंदणीकृत नाहीत, त्यांनी तातडीने नोंदणी करावी. ज्या नोंदणीकृत डॉक्टरांचे नूतनीकरण प्रलंबित आहे, त्यांनी विलंब न करता अर्ज सादर करावा. नाव, पत्ता किंवा अन्य तपशिलांत दुरुस्ती आवश्यक असल्यास संबंधित कागदपत्रांसह अर्ज करणे बंधनकारक आहे.