मोना सिंह हे टीव्ही इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे. काही बॉलिवूड सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. आता ती बिग बजेट आणि मलिस्टारर फिल्ममधून स्वत:ची ओळख बनवण्यासाठी कॉन्फिडेंट आणि एक्सायटेड आहे.
2019 साली मोना सिंह लग्न करुन संसाराला लागली. त्याआधी एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात ती वेडी होती. दोघांचं लग्न सुद्धा होणार होतं. पण नंतर त्यांचं नातं तुटलं. चित्रपटात मोना सनी देओलची पत्नी बनली आहे. खऱ्या आयुष्यात त्यांच्या वयात 24 वर्षांचं अंतर आहे.
मोना सिंहचा जन्म 8 ऑक्टोंबर 1981 साली चंदीगडमध्ये झाला. 44 वर्षाच्या मोनाने 2003 साली आलेल्या ‘जस्सी जैसी कोई नहीं’ मालिकेतून वेगळी ओळख बनवली. या मालिकेने तिला घराघरात प्रसिद्ध केलं. मोनाने ‘राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी’, ‘क्या हुआ तेरा वादा’ आणि ‘प्यार को हो जाने दो’ सारख्या मालिकांमध्ये सुद्धा काम केलं.
मोनाने वर्ष 2009 मध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट थ्री इडियट्समधून बॉलिवूडमध्ये डेब्यु केला. तिने करीना कपूरच्या मोठ्या बहिणीचा रोल साकारलेला. त्यानंतर ती ‘जेड प्लस’, ‘मुंज्या’ आणि ‘ऊट पटांग’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. 2022 साली आलेल्या करीना कपूर आणि आमिर खान यांच्या ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये मोनाने आमिरच्या आईचा रोल साकारलेला.
मोनाचं प्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवालसोबत अफेअर होतं. दोघे आपल्या नात्याबद्दल सीरियस होते. लग्न करणार होते. पण त्यांचं ब्रेकअप झालं. मग अभिनेत्रीने 27 डिसेंबर 2019 रोजी श्याम गोपालन उर्फ श्याम राजागोपालन याच्याशी लग्न केलं. तो एक इन्वेस्टमेंट बँकर आहे.