मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरिजा ओक पुन्हा एकदा आपल्या सोज्वळ सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे.
नुकत्याच निळ्या रंगाच्या साडीत तिच्या मोहक लूकने चाहत्यांची मने जिंकली होती. त्यानंतर आता रॉ सिल्क साडीतील तिचा नवा अंदाज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अशातच तिने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच नागपूर इथे मुलाखत घेतली. ना पोहा विथ नितीनजी असं या कार्यक्रमाचं नाव होतं.
या कार्यक्रमासाठी गिरिजाने रॉ सिल्क साडी नेसली होती आणि आद्याचे दागिने घातले होते. गिरिजा नेहमीप्रमाणे अतिशय गोड दिसली आहे.
रॉ सिल्क साडीतील गिरिजाचा लूक साधा आणि चाहत्यांना आकर्षित करणारा आहे. पारंपरिक दागिन्यांसोबत केलेला हा लूक तिच्या नैसर्गिक सौंदर्याला अधिक खुलवणारा ठरतोय.
गिरिजाच्या या फोटोंवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभिनयासोबतच फॅशन सेन्समुळेही गिरिजा नेहमीच चर्चेत असते हे पुन्हा एकदा तिने सिद्ध केलं आहे.