Latest Marathi News Live Update : नागपुरात रात्री दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत दोन हत्येच्या घटना
esakal January 23, 2026 10:45 PM
Nagpur Live: नागपुरात रात्री दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत दोन हत्येच्या घटना

नागपुरात रात्री दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत दोन हत्येच्या घटना घडल्या आहेत. अजनी पोलीस स्टेशन हद्दीत अलंकार नगर मानेवाडा परिसरात योगेश काकडे नामक युवकाची हत्या करण्यात आली. यात आरोपी मयंक नितीन धबेकर असून तो फक्त 17 वर्षांचा आहे. अजनी परिसरात घडलेली हत्या ही जुन्या वादातून एकमेकांना धमकी देत असताना घडली. आरोपीने धारदार शस्त्राने वार करत ही हत्या केली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरी घटना गिट्टीखदान पोलीस स्टेशन हद्दीत घडली.

रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला

व्यवहारादरम्यान रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 91.99 या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून सतत होत असलेली विक्री आणि जागतिक स्तरावर वाढत्या व्यापार तणावामुळे रुपयातील ही घसरण दिसून येत आहे.

जळगावच्या पाचोऱ्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण

जळगावातील पाचोऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचं प्रकरण उघड झालं आहे. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोघांना अटक केली असून एक जण फरार आहे.

Mumbai Live : दहिसरमधील शुक्ला कंपाउंड तोडक कारवाई प्रकरणी रहिवाशांना मोठा दिलासा

दहिसरमधील शुक्ला कंपाउंड तोडक कारवाई प्रकरणी रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे प्रकरण विधानसभेच्या दिवाळी अधिवेशनात चांगलेच गाजले असून पाच आमदारांनी यावर प्रश्न उपस्थित केले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि माजी खासदार गोपाळशेट्टी यांच्यात काल या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. स्लम अॅक्टअंतर्गत संरक्षण असताना पालिकेने कारवाई कशी केली, असा सवाल करत नार्वेकर यांनी पालिका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच पुढील बैठकीत पालिका आयुक्तांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. दिलासा मिळाल्यानंतर शुक्ला कंपाउंडमधील रहिवाशांनी पेढे भरून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचे आभार मानले.

Kupwad Live : चार चंदन वृक्षांची चोरी; कुपवाड वनविभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात

कुपवाड वनविभागाच्या आवारातून पंधरा दिवसांपूर्वी रातोरात चार चंदनाची झाडे तोडून नेल्याची घटना अद्याप गूढच राहत आहे. चोख सुरक्षा व्यवस्था असूनही चोरटे अद्याप सापडलेले नाहीत, त्यामुळे वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. इतक्या संरक्षित परिसरातून एक दोन न्हवे, तर चार पूर्णपणे वाढलेल्या चंदन वृक्षांची चोरी होऊ शकते, तर सुरक्षितता नेमकी कितपत आहे, असाही सवाल व्यक्त होत आहे. तपासी अधिकारी सुधीर सोनवणे सांगतात, “चंदनाची चोरी मुख्य प्रवेशद्वारातून नव्हे, तर पाठीमागील फाटकातून झाली असावी.

Mumbai Live : महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची ईडीकडून महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून मुक्तता करण्यात आली आहे.  यापूर्वी एसीबीनेही त्यांना या प्रकरणात निर्दोष सोडले होते.

Nagpur Live : नागपूरच्या ओयो हॉटेलमध्ये तरुणीची हत्या, प्रेमप्रकरणातून शेवट

नागपूरच्या कमळेश्वर रोडवर फेटरी परिसरात ओयो हॉटेलमध्ये प्रेमप्रकरणातून एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. सौरभ जामगडेने त्याची प्रेयसी रुचिता भांगेच्या गेल्यावर चाकूने वार करून हत्या केली. हॉटेलमधील खोलीत वाद झाला आणि हल्ल्यानंतर आरोपीने पहिल्या मजल्यावरून उडी मारून फरार झाला.

Live: अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची श्रीरामपूरात अवैध गॅस रिफीलिंग विरोधात कारवाई

श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवरील कांदा मार्केट परिसरात कारवाई...

वाहनामध्ये अवैधरित्या घरगुती गॅस रिफीलिंग करणारे दोघे ताब्यात...

एच.पी आणि भारत गॅस कंपनीच्या घरगुती वापरच्या 14 गॅस टाक्यांसह 1 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...

अवैध गॅस रिफीलिंग प्रकरणी सलमान पठाण आणि लुकमान पठाण या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात...

आरोपीं विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल...

Live: राहाता तालुक्यात बिबट्यांचा मुक्तसंचार

पिंपळस गावात बिबट्यांचा मुक्त संचार

दोन बिबट्यांचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

पाळीव कुत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न फसला

Maharashtra live : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांना मोठा दिलासा

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांना मोठा दिलासा

एसीबीनंतर आता ईडीच्या केसमध्ये निर्दोष मुक्तता

Live : सांगोला तालुक्यात भीषण अपघात; भरधाव ट्रॅक्टरची धडक, १२वीतील मुलीचा जागीच मृत्यू

सांगोला तालुक्यातील वाकी येथे इयत्ता 12 वीत शिकणाऱ्या मुलीला भरधाव ट्रकक्टरने जोरात धडक दिली. या अपघातामध्ये तीचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात नंतर येथील ग्रामस्थांनी रस्त्यावर येवून आंदोलन केले.

सांगोला अकलूज महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. वाकी येथे आज सकाळी शाळेतून घरी जाणार्या ऋतुजा धनाजी कोकरे या शाळकरी मुलीला ट्रॅक्टरने धडक दिली.

Pune live: पुणे महापालिकेच्या अभियंता भरती परीक्षेवर उमेदवारांचा संताप, मुख्य गेटसमोर आंदोलन

पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरतीसाठी येत्या 25 जानेवारी रोजी होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेच्या आयोजनावर उमेदवारांकडून तीव नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षा केंद्रांची निवड, प्रचंड भौगोलिक अंतर, अपुऱ्या सुविधा आणि पारदर्शकतेअभावी ही परीक्षा अन्यायकारक ठरत असल्याचा आरोप करीत उमेदवारांनी महापालिकेच्या मुख्य गेटसमोर आंदोलन केले.या भरती प्रक्रियेसाठी प्रत्येकी एक हजार रुपये शुल्क भरून सुमारे 42 हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केला आहे. मात्र, हॉल तिकीट प्राप्त झाल्यानंतर अनेक उमेदवारांना घरापासून 400 ते 500 किलोमीटर दूर असलेली खासगी परीक्षा केंद्र दिल्याचे उघड झाले आहे.

Dhule Live: धुळे महानगरपालिकेवर महिलाराज

धुळे महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा महिला राज आपल्याला बघावयास मिळणार आहे, कारण धुळे महानगरपालिकेत सर्वसाधारण महिला आरक्षण महापौर पदासाठी जाहीर झाल आहे, आणि धुळे महानगरपालिकेच्या 74 नगरसेवकांच्या पदासाठी जवळपास 41 महिला या नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत, त्यामुळे धुळे महानगरपालिकेच्या नगरसेवकांमध्ये महिलांची संख्या लक्षवेधी ठरली आहे.

Nilesh Lanke: खासदार निलेश लंकेंच्या भावाला दोन आठवड्यात पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश

महिलेचा विनयभंग करून तिला जातीवाचक शिवी दिल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने खासदार निलेश लंके यांचे भाऊ दीपक लंके आणि त्यांच्या इतर दोन समर्थकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. या प्रकरणातील आरोपी राहुल बबन झावरे, संदीप लक्ष्मण चौधरी आणि निलेश लंके यांचे भाऊ दीपक ज्ञानदेव लंके यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे यांनी दिलेल्या आदेशानुसार, आरोपींना दोन आठवड्यांच्या आत तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Pune Live: तारीख ठरली! पुण्याचा महापौर या दिवशी निवडला जाणार
  • ३० किंवा ३१ जानेवारी रोजी मिळणार पुण्याला महापौर

  • पुणे महापालिकेच्या महापौर पदासाठी यंदा सर्व साधारण महिला आरक्षण

  • पुणे महापालिकेसाठी दहावी महिला महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष

  • असा असणार पुणे महापालिका महापौर उपमहापौर निवडीचा कार्यक्रम

Liveupdate: बदलापूर अत्याचार प्रकरणी अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट

बदलापूर अत्याचार प्रकरणात राष्ट्रवादीचे अजित पवार पक्षाचे पदाधिकारी गटशिक्षण अधिकाऱ्यांना भेटले आहेत. या प्रकरणात खाजगी शाळा आणि खाजगी व्हॅन यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी संगीता चेंदवणकर यांनी केली आहे.

Navi Mumbai Liveupdate : नवी मुंबईत सागर नाईक यांची भाजपच्या गटनेते पदी नियुक्ती

नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपचे गटनेते म्हणून सागर नाईक यांची नेमणूक करण्यात आली आहे. भाजपकडे आता 66 सदस्यांचे संख्याबळ आहे. भाजपकडून कोकण भवन येथे गट स्थापन करण्यात येत आहे आणि अपक्ष सदस्यांनी भाजपला एक पाठिंबा दिला आहे.

Nashik Mayor : नाशिक महापालिकेत एकीकडे भाजपमध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच, शिंदे गटात मात्र संभ्रम

Nashik Mayor : नाशिक महापालिकेत एकीकडे भाजपमध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच, शिंदे गटात मात्र संभ्रम

नाशिक महापालिकेत एकीकडे भाजपमध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू असताना शिंदेंच्या शिवसेनेत मात्र संभ्रम कायम

भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हायचं की विरोधी बाकावर बसायचं? यावर अद्याप निर्णय नाही

यासंदर्भात एकनाथ शिंदेचं अंतिम निर्णय घेतील, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांची माहिती

येत्या २ ते ३ दिवसात आम्ही गट नोंदणी करणार आहोत, काही तांत्रिक मुद्द्यांमुळे गटाची नोंद करण्यासाठी झाला उशीर, अजय बोरस्ते यांची माहिती.

Latur: लातूरमध्ये महापौर पदासाठी कोणाची वर्णी लागणार?

Latur: लातूरमध्ये महापौर पदासाठी कोणाची वर्णी लागणार?

लातूर महानगरपालिकेतील महापौर पद हे SC एसी महिलेसाठी राखीव सोडण्यात आल आहे, तर महानगरपालिकेवर महापौर पदासाठी काँग्रेसकडून 3 महिला उमेदवारांची नावे समोर येताना पाहायला मिळत आहेत.

कांचन अजनीकर, मनीषा बसपुरे, जयश्री सोनकांबळे या महिला उमेदवारांची नावे सध्या समोर येताना पाहायला मिळत आहे.

मात्र यापैकी कुणाची वर्णी महापौर पदासाठी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले..

Live : नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकांत आज महत्त्वाचा निर्णय! Mahad Live : महाड नगर परिषद राडा प्रकरण; विकास गोगावले पोलिसांसमोर शरण

महाड नगर परिषदेत झालेल्या राडा प्रकरणी विकास गोगावले यांनी महाड पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ते स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाले. या पार्श्वभूमीवर महाड पोलिस ठाण्यात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Pune Live : देशातील वाहतूक कोंडीत पुणे दुसऱ्या क्रमांकावर; १० किमी अंतरासाठी लागतात तब्बल ३३ मिनिटे

देशात सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये पुण्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. टॉमटॉम या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ताज्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. पुण्यात वाहनचालकांना अवघे १० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सरासरी ३३ मिनिटे २० सेकंद लागतात. गर्दीच्या वेळेत शहरातील वाहनांचा वेग केवळ १५.१ किमी प्रतितास इतका असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. वाढती वाहतूक कोंडी कमी करणे हे नव्या कारभार्यांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

Beed : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी

आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात येणार.

हत्या प्रकरणातील साक्षीदारांची यादी सरकारी वकील न्यायालयाकडे देणार आहेत.

न्यायालयाकडून साक्षीदारांना आज नोटीस इशू होतील आणि नंतर प्रत्यक्षात साक्षीदार हजर राहतील.

त्याचबरोबर या प्रकरणातील फिर्यादी यांना देखील नोटीस इशू करण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या 168 जागांसाठी 633 उमेदवार रिंगणात

रत्नागिरी - जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या 168 जागांसाठी 633 उमेदवार रिंगणात

जिल्हा परिषद साठी 202 तर, पंचायत समिती साठी 431 अर्ज ठरले वैध

आता प्रतीक्षा माघारीची

तीन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात

Dharashiv : ईव्हीएमच्या मुद्द्यावरून धाराशिवमध्ये असंतोष निर्माण करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र

ईव्हीएमच्या मुद्द्यावरून धाराशिवमध्ये असंतोष निर्माण करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ईव्हीएम विरोधातील उपोषणाला भेट दिल्यानंतर, रस्त्यावर जाळपोळ आणि बसची तोडफोड

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांचा गंभीर आरोप

आठवडाभरापासून धाराशिवच्या कळंब तालुक्यातील तांदळवाडी येथे ईव्हीएम विरोधात आमरण उपोषण सुरू

धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान कडून उपोषण, उपोषणाची दखल न घेतल्याने टायर पेटवत निषेध

Yogesh Kadam : प्रजासत्ताक दिनी गृहराज्यमंत्री योगेश कदम करणार नंदुरबार येथे ध्वजारोहण

रत्नागिरी : गृहराज्यमंत्री योगेश कदम नंदुरबार येथे ध्वजारोहण करणार आहेत. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याचा त्यांना मान मिळाला आहे. मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक काढले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंदुरबार येथील प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा योगेश कदम यांना दिला आहे. मंत्री झाल्यानंतर योगेश कदम प्रथमच शासकीय ध्वजारोहण करणार आहेत.

Belgaum News : कचरा संकलन वाहनाचा अपघात; मुगळीतील तीन महिला जखमी

चिक्कोडी : तालुक्यातील मुगळी गावात कचरा संकलन करणाऱ्या वाहनाचा अपघात होऊन तीन महिला कर्मचारी जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या अपघातात तीन महिला जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करून जखमींना चिक्कोडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या तिघींची प्रकृती स्थिर असून, उपचार सुरू आहेत

Karnataka News : राज्यपालांच्या भाषणाचा मुद्दा आज येणार चर्चेत

बंगळूर : राज्यपालांच्या भाषणावेळी कायदा मंत्री तसेच सत्ताधारी पक्षाच्या काही आमदारांनी अडथळा आणल्याच्या प्रकरणावर आज (ता. २२) सभागृहात कोणती कारवाई करावी, याबाबत चर्चा करण्याची संधी दिली जाईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांनी दिली.

Republic Day : प्रजासत्ताकदिनी शाळांना सुटी नाही; शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडून आदेश जारी

पुणे : राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय आणि खासगी व्यवस्थापनांच्या सर्व शाळांना प्रजासत्ताकदिनी (ता. २६) देशभक्तिपर गीतांवर सामूहिक कवायत संचलनाचा कार्यक्रम आयोजित करणे अनिवार्य आहे. यात विद्यार्थ्यांच्या १०० टक्के उपस्थितीचे उद्दिष्ट आहे. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या दोन्ही दिवशी शाळांना सुट्टी देण्यात येऊ नये, असा आदेश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिला आहे.

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) समन्सकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपातून आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल आणि अमानतुल्लाह खान यांची राऊज अव्हेन्यू न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

Budget Session : अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला २७ रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन

नवी दिल्ली : येत्या २८ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केंद्रातील मोदी सरकारने २७ जानेवारीला सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. एक फेब्रुवारीला संसदेत मांडल्या जाणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाशी संबंधित आवश्यक मुद्यांवर तसेच या अधिवेशनात विरोधी पक्षांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या मुद्यांवर सर्वपक्षीय बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजीजू यांनी संसद भवनात २७ जानेवारीला सकाळी ११ वाजता ही बैठक बोलावली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्वार्धातील कामकाज २८ जानेवारीपासून ते १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून २३ दिवसांच्या अवकाशानंतर नऊ मार्चपासून सुरू होणाऱ्या उत्तरार्धाचा समारोप दोन एप्रिलला होणार आहे. एक फेब्रुवारीला रविवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारचा तेरावा आणि स्वतःचा सलग नववा विक्रमी अर्थसंकल्प संसदेत मांडतील.

T20 World Cup : टी-२० वर्ल्डकपमधून बांगलादेश बाहेर

ढाका/नवी दिल्ली : ‘आयसीसी’ने थेट इशारा दिल्यामुळे नाड्या आवळल्या गेलेल्या बांगलादेशने अखेर भारत-श्रीलंकेमध्ये संयुक्तपणे होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यांच्याऐवजी स्कॉटलंड हा संघ स्पर्धेत सहभागी होणार आहे.

Jammu and Kashmir News : जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन कोसळून दहा जवानांचा मृत्यू

Latest Marathi Live Updates 23 January 2026 : महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली असून, संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई आणि पुण्यासह १५ महापालिकांची सूत्रे महिलांकडे असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड समजला जाणाऱ्या ठाणे महापालिकेच्या महापौरपदाचा मान अनुसूचित जातीच्या (एससी) उमेदवारास मिळणार आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. तसेच जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यामध्ये गुरुवारी लष्कराचे वाहन खोल दरीमध्ये कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये दहा जवान मरण पावले, तर अन्य अकरा जण हे गंभीर जखमी झाले आहेत. या वाहनावरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटल्याने ते भरधाव वेगात दरीत जाऊन कोसळले. येत्या २८ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केंद्रातील मोदी सरकारने २७ जानेवारीला सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. याशिवाय देश आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन तसेच मान्सूनविषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी एका क्लिकवर सविस्तर माहिती मिळवा...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.