जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराच्या शुभारंभ कार्यक्रमात अजित पवार संतापले, नेमकं कारण काय?
जयदीप भगत, बारामती January 24, 2026 09:43 PM

Ajit Pawar :  महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी झाली आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दोन कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यामुळं संताप व्यक्त केला. स्वतःला डायरेक्टर आणि आईला नगरसेवक करुन घेतले. स्वतःच काम झालं की झालं का? उद्या येऊन दोघांना भेटायला सांगा. हे असलं चालणार नाही असे मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

मला साहेबांमुळे, राजीव गांधी यांच्यामुळे संधी मिळाली

आपल्याकडे राज्यपाल प्रजासत्ताक दिन साजरा करतात पण आपले राज्यपाल गुजरात आणि महाराष्ट्रासाठी एकच आहेत त्यामुळे ते गुजरात ला प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. मला साहेबांमुळे, राजीव गांधी यांच्यामुळे संधी मिळाली त्यामुळे मी कधी जातीचा पातीचा विचार केला नाही. यावेली कृषी प्रदर्शन 8 दिवस आम्ही ठेवलं होतं. माळेगावच्या शिक्षण संस्थेसाठी 5 कोटी सीएसआरमधून मंजूर केला आहे. 24 ते 55 पर्यतचे उमेदवार आम्ही दिले आहेत. त्यामुळे काही जण नाराज झाल्याचे अजित पवार म्हणाले. 

आगामी काळात वेगवेगळ्या ठिकाणी संधी देऊ. माझा व्याप जरी वाढला असला तरी माझं लक्ष इथे आहे. मी हलक्या कानाचा नाही. माझं सगळीकडे लक्ष असते असे अजित पवार म्हणाले. आम्ही हर्षवर्धन पाटील एक झालं तर बिघडलं कुठं. आम्ही काय भांडत बसायचं का? असा सवाल देखील अजित पवार यांनी केला. 

आम्ही 394 कोटींचे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बनवत आहोत. 94 कोटी खर्च करून डॉग स्कोड साठी मंजूर केलेत. त्याच केंद्र आपण बारामती तालुक्यात करतो आहे. 525 कोटी जनावरांच्या डॉक्टर तयार करण्यासाठी खर्च करत आहोत. 325 कोटींचे कॅन्सर हॉस्पिटल करत आहोत असे अजित पवार म्हणाले. दोन कार्यकर्ते आले नाहीत, यावरुन अजित पवार चांगलेच चिडले. स्वतःला डायरेक्टर आणि आईला नगरसेवक करून घेतले. स्वतःच काम झालं की झालं का? उद्या येऊन दोघांना भेटायला सांगा. हे असलं चालणार नाही असे अजित पवार म्हणाले. 

तांदूळवाडीला 10 ते 12 एकरावर सायन्स पार्क करणार

उद्या मी नांदेड ला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत म्हणून मी तिकडे जाणार आहे. मी संस्थांची मिटिंग बोलावली आहे. या काळात मला तुम्हाला कऱ्हा नीरा उपसा सिंचन योजनेस करायची आहे.  ही योजना 1 हजार कोटींची आहे. अडीच टीएमसी पाणी आणणार आहे. मी तांदूळवाडीला 10 ते 12 एकरावर सायन्स पार्क करत आहे. आम्ही कन्हेरी इथली मोकाट जनावरे पकडली आणि उजनी च्या पलीकडे नेऊन सोडली. हा काळ लै आधीचा आहे असेही अजित पवार म्हणाले. पुणे जिल्ह्यातील 2 हजार  शाळा विकसित करणार आहे. सायकल स्पर्धेमुळे 450 किलोमीटर चे रस्ते चांगले झाले. पाच/दहा वर्षे रस्त्याला काही होणार नाही. इथे स्टार रोड करायचे चालले आहे, असे अजित पवार म्हणाले. 

कुणी जमिनी विकायच्या भानगडीत पडू नका

पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आपण करतोय. 3200 एकरावर डबल धावपट्टी करणार आहोत. कुणी जमिनी विकायच्या भानगडीत पडू नका असे अजित पवार म्हणाले. 94 टक्के लोकांनी संमती दिली आहे. आपण कार्गो करणार आहोत असे अजित पवार म्हणाले. जगातील 19 व्या नंबरचे तर देशात दोन नंबर चे विमानतळ होणार आहे. त्यामुळं मोठा कायापालट होणार आहे . जर कुणाकडे  पैसे असतील तर तिकडे जमीन घ्या असे अजित पवार म्हणाले. साहेबांनी आणि आपण मिळून अनेक कंपन्या आणल्या. आपण आता दोन मोठे प्रकल्प आणतो आहे. कल्याणी यांची गुंतवणूक आहे 1100 कोटींची तर मिलकिंग मिल्क मध्ये 1130 कोटींचे गुंतवणूक आहे. त्यामुळे कायापालट होणार आहे असे अजित पवार म्हणाले. 

छत्रपती कारखान्यात चेअरमन व्हायचं माझं स्वप्न होतं

छत्रपती कारखान्यात चेअरमन व्हायचं माझं स्वप्न होत. माझ्या स्वप्नात पण वाटलं नव्हतं की मी माळेगावचा चेअरमन होईल. माझं लग्न झालं नव्हतं तेव्हा मी संचालक होतो. संचालक झालो म्हणून माझं लग्न झाल्याचे अजित पवार म्हणाले. केंद्रात आणि राज्यात आपण कारभार करतो आहे. त्यामुळे काही गोष्टी कराव्या लागतात. माझ्याकडे बघून मतदान करा असे अजित पवार म्हणाले. प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने माझ्यासोबत होते ना. काहींना दुसरे जण बोलवत आहेत. ते तिकडे गेल्याचे अजित पवार म्हणाले. 

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.