उत्तर प्रदेश या महत्त्वाच्या राज्यात राजकीय पाय रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस पक्षाला शनिवारी मोठा धक्का बसला. पश्चिम उत्तर प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा पक्षाध्यक्ष मलिककार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे तसेच प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना पाठवला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजय राय त्यांचे मन वळविण्यासाठी त्यांच्या घरी जाऊ शकतात. सध्या उत्तर प्रदेशात काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. शनिवारी दुपारी नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी पक्ष नेतृत्वाकडे आपला राजीनामा पाठवला. ज्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. सिद्दीकी यांनी अचानक राजीनामा देण्याच्या निर्णयामागील कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत.
Japanese AI Company: जपानची AI कंपनी भारतातील या राज्यात करणार मोठी गुंतवणुक, कृषी क्षेत्रात करणार प्रोटीन क्रांती!प्राथमिक माहितीनुसार, वरिष्ठ राज्यातील नेत्यांना त्यांच्याशी बोलण्यासाठी पाठवले जात आहे. नसीमुद्दीन यांनी पत्रात राजीनामा देण्याचे कारण स्पष्टपणे सांगितले नाही, परंतु त्यांनी त्यांच्या समर्थकांसह काँग्रेस पक्षाचा राजीनामादिला आहे. असे वृत्त आहे की ते वरिष्ठ नेतृत्वावर नाराज होते आणि काही काळापासून पक्षात त्यांना बाजूला ठेवण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय राय नसीमुद्दीन सिद्दीकीच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी बोलू शकतात. त्यांना राजीनामा मागे घेण्यास भाग पाडू शकतात.
UP Foundation Day 2026: २४ जानेवारीलाच का साजरा होतो युपी स्थापना दिवस?, काय आहे महाराष्ट्र कनेक्शन?, जाणून घ्या रंजक इतिहास!राय यांनी यापूर्वी अनेक नेत्यांच्या घरी जाऊन त्यांचे मन वळवले आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात, नसीमुद्दीन सिद्दीकीच्यासारख्या नेत्याचे जाणे पक्षासाठी मोठे नुकसान आहे. कारण येथे अल्पसंख्याक मते महत्त्वाची आहेत. बुंदेलखंड तसेच पश्चिम उत्तर प्रदेशात सिद्दीकीचे मजबूत नेटवर्क आहे. एक वर्षानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.