Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात शॉकिंग एलिमिनेशन; 'या' सदस्यांचा पत्ता कट, चाहते नाराज
Saam TV January 24, 2026 09:45 PM

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी 6’ च्या नव्या सीझनमध्ये पहिलीच एलिमिनेशनची चर्चा प्रचंड गाजू लागली आहे. 11 जानेवारीपासून सुरू झालेल्या या रिऍलिटी शोमध्ये नॉमिनेट झालेल्या नऊ स्पर्धकांपैकी कोण घराबाहेर जाणार? हा प्रश्न आता मुख्य चर्चेचा विषय बनला आहे. परंतु “बिग बॉस” कडून पहिल्या आठवड्यात कोणालाही घराबाहेर काढले गेले नाही आणि सर्व स्पर्धकांना एक संधी देण्यात आली होती.

शोमध्ये नॉमिनेट झालेल्या प्रभू शेळके, अनुश्री माने, दिव्या शिंदे,सागर कारंडे, राधा पाटील, रोशन भजनकर, दिपाली सय्यद, करण सोनावणे आणि रुचिता जामदार हे नऊ सदस्य आठवडाभर नॉमिनेटेड राहिले. आता दोन्ही आठवड्यांच्या व्होटिंग ट्रेंडनुसार कोणाचा प्रवास येथे संपणार हे पाहणं महत्वाचं ठरत आहे.

Border 2: सनी देओलच्या 'बॉर्डर २'ची क्रेझ न्यारी; आधी पोस्टरवर हार घातला, नंतर दूधाचा अभिषेक केला, पाहा VIDEO

व्होटिंगनुसार रोशन भजनकर यांना सर्वाधिक मतं मिळाली असून तो सेफ होईल. त्याचबरोबर दिव्या शिंदे आणि करण सोनावणे यांनी प्रेक्षकांकडून भरभराटीची समर्थन मिळवली आहे. सागर कारंडे, दिपाली सय्यद आणि अनुश्री माने यांनाही चांगले मत मिळाले. मात्र सध्याच्या ट्रेंडनुसार प्रभू शेळके, रुचिता जामदार आणि राधा पाटील हे “डेंजर झोन” मध्ये आहेत आणि या तीनही सदस्यांना कमी व्होट्स मिळाल्याचे दिसत आहे.

Actor Second Marriage: अभिनेत्याने केलं दुसरं लग्न, 19 वर्षांच्या मुलीला सोशल मीडियावरून समजलं; रडत म्हणाली, 'एक मुलगी म्हणून...'
View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)