Plan a Budget-Friendly Weekend Trip to Konkan: परदेशात फिरण्याचं स्वप्न अनेकांच्या मनात असतं. मात्र वेळेची अडचण किंवा मोठा खर्च यामुळे अनेकदा हे स्वप्न अपूर्ण राहतं. पण काळजी करू नका. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वसलेला तारकर्ली बीच ज्याला 'मिनी मालदीव' म्हणून ओळखलं जात.
आज पर्यटकांमध्ये हा बीच विशेष लोकप्रिय होत आहे. येथे स्वच्छ, निळसर समुद्र आणि लांबच लांब पसरलेला शुभ्र वाळूचा किनारा पहिला की, क्षणभर तुम्ही भारतात आहार हे विसरून जाल.
कमी खर्चात मस्त ट्रॅव्हल प्लॅनलांबच्या ट्रिपसाठी मोठं बजेट लागतं, पण वीकेंडला कुठेतरी शांत आणि सुंदर ठिकाणी जायचं असेल, तर कोकण हा उत्तम पर्याय आहे. कमी खर्चात निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल, तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेस्ट ठरू शकतं.
Beed Police Patil Bharti 2026: बीड जिल्ह्यात पोलीस पाटील भरती 2026 ची जाहिरात प्रसिद्ध; रिक्त जागा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या तारकर्लीची खास वैशिष्ट्येतारकर्लीचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथला स्वच्छ समुद्र. पाण्याची पारदर्शकता इतकी आहे की पाण्यातील हालचाल सहज दिसते. गर्दीपासून दूर असल्यामुळे इथे शांतता आणि निवांतपण दोन्ही मिळतो.
अॅडव्हेंचर प्रेमींसाठी खास अनुभवफक्त निसर्गदर्शनच नाही, तर साहसाची आवड असणाऱ्यांसाठीही तारकर्ली टउत्तम आहे. इथे स्कुबा डायव्हिंगचा अनुभव घेता येतो. पाण्याखाली रंगीबेरंगी मासे आणि सुंदर सागरी जीवन पाहण्याची संधी इथे मिळते. जी अनेकांसाठी आयुष्यातील अविस्मरणीय आठवण ठरते.
हाऊसबोटींगतारकर्ली परिसरात करळी नदीच्या मुखाशी हाऊसबोट आणि बोटिंगची सुविधाही उपलब्ध आहे. नदी आणि समुद्र यांचा संगम पाहत बोटीतून फिरण्याचा अनुभव खूपच खास वाटतो.
कपल्ससाठी रोमँटिक डेस्टिनेशनविकेंडला जोडीदारासोबत शांत वेळ घालवायचा असेल, तर तारकर्ली एक उत्तम पर्याय आहे. समुद्रक्रिनारी फेरफटका मारत, छोट्या गाडीवरील भेळ खात सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहण्याचा अनुभव खूप रोमँटिक असतो.
Aquarius Horoscope 2026: 6 फेब्रुवारीनंतर बदलणार नशिबाचे गणित! कुंभ राशीत तयार होतोय शक्तिशाली ग्रहयोग कुटूंबासोबत बेस्टलहान मुलांसोबत फिरायला जायचं असेल, तरीही तारकर्ली सुरक्षित मानलं जातं. वाळूवर खेळण्यासाठी मोकळी जागा आणि तुलनेने शांत असल्यामुळे कुटूंबीय निश्चिंतपणे वेळ घालवू शकतात.
अस्सल मालवणी जेवणाची मेजवानीकोकणात गेल्यावर मालवणी जेवणाचा आस्वाद घेतलाच पाहिजे. तारकर्ली परिसरात तुम्हाला ताज्या मासळीचे पदार्थ, सोलकढी, भाकरी आणि इतर पारंपरिक मालवणी चवींचा आनंद घेता येतो.