AKJ26B01551
लवंग (ता. माळशिरस) : येथील बाल आनंद बाजारात खरेदीसाठी जमलेली ग्राहकांची गर्दी.
........
लवंग शाळेत बालआनंद बाजार
........
लवंग : माळशिरस तालुक्यातील लवंग येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने बाल आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात ६५ विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रारंभी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण वाघ यांच्या हस्ते या बाल आनंद बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. या बाजारात पालेभाज्या, फळभाज्या, फळे, गावरान मेवा, चहा, कॉफी, शीतपेये, वडापाव, पाणीपुरी, शैक्षणिक साहित्य, खेळणी-फुगे, स्टेशनरी, ज्वेलरी आदींची दुकाने थाटली होती. खरेदीसाठी पालकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी हळदी-कुंकू कार्यक्रमही पार पडला. आनंदी बाजार यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका संगीता भोंग, शुभांगी हिरवे, करीम कोरबू, जावेद मुलांनी यांनी परिश्रम घेतले.