कोळवण, ता. २४ : ग्रामदैवत भैरवनाथ वार्षिक उत्सवानिमित्त नांदगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. सप्ताहाचे हे ४४ वे वर्ष आहे. रथसप्तमी रविवार (ता. २५) ते शुक्रवार (ता. ३०) पर्यंत करण्यात आले आहे. या सप्ताहात पहाटे काकडआरती श्रीज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी प्रवचन, हरिपाठ, अन्नप्रसाद, रात्री कीर्तन, हरिजागर होणार असून रविवारी (ता. २५) प्रकाश महाराज जंजीरे, सोमवारी (ता. २६) भरत महाराज थोरात, मंगळवारी(ता. २७) गोविंद महाराज गोरे, बुधवारी (ता. २८) ओंकार महाराज दुडे शास्त्री, गुरुवारी (ता. २९) गहिनीनाथ महाराज खेडकर, शुक्रवारी (ता. ३०) दत्तात्रेय महाराज फरांदे यांचे काल्याचे कीर्तन, शनिवारी (ता. ३१) सायंकाळी ग्रामदैवत भैरवनाथ देवाची पालखी मिरवणूक रात्री माउली कृपा कला नाट्य रंगीत संगीत भजनी भारुड मंडळ जांबुत (ता. शिरुर) यांचे भजनी भारुड होणार असून सप्ताहातील कीर्तन श्रवणाचा, भोजन महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थ मंडळी नांदगाव, स्वरसाधना भजनी मंडळ नांदगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.