पिंपरी, ता. २४ ः स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या ‘युवक सप्ताहा’चे औचित्य साधून, लाइफ लाईन ब्लड सेंटर’ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना तातडीच्या परिस्थितीत रक्ताची कमतरता भासू नये, या उद्देशाने २१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत मोफत रक्त पिशव्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गरजू विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ब्लड सेंटरचे अध्यक्ष सुनील नाईकनवरे आणि सचिव नामदेव पवार यांनी केले आहे.