Mumbai Local: विकेंडला मुंबईकरांचे हाल होणार! तिन्ही लोकल मार्गांवर मेगाब्लॉक, वेळापत्रकात मोठे बदल
esakal January 25, 2026 08:45 AM

मुंबई : विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रेदरम्यान रविवारी (ता. २५) ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य, हार्बर रेल्वे मार्गांवरील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

मध्य रेल्वे

कुठे : माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत

परिणाम : सीएसएमटीहून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० वाजण्यादरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानक येथून डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा मुलुंड स्थानकावरून पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

ठाणेयेथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ वाजेदरम्यान सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकातून अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड ते माटुंगादरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर माटुंगा स्थानकावरून या गाड्यापुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

Uday Samant: दावोस येथे राज्याचा गुंतवणुकीचा विक्रम: उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, दौऱ्यात एकूण ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार! हार्बर मार्ग

कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे स्थानकादरम्यान

कधी : सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत

परिणाम : सीएसएमटीहून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजण्यादरम्यान वाशी, बेलापूर, पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा तसेच सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजण्यादरम्यान वांद्रे, गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

दुसरीकडे पनवेल, बेलापूर, वाशी स्थानक येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० वाजण्यादरम्यान सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा तसेच गोरेगाव, वांद्रे स्थानक येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ वाजण्यादरम्यान सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

या ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (फलाट क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा २० मिनिटांच्या अंतराने चालविण्यात येणार आहेत.

BMC Mayor : भाजप-शिवसेनेचा पेच सुटेना, महापौरपदाची निवड लांबणीवर; फेब्रुवारीत होणार निर्णय पश्चिम रेल्वे (हार्बर)

कुठे : माहीम ते अंधेरी अप आणि डाउन

कधी : सकाळी ११ ते दुपारी ४

परिणाम : ब्लॉकवेळेत चर्चगेट ते गोरेगाव, सीएसएमटी ते वांद्रे, सीएसएमटी ते वांद्रे या तिन्ही मार्गांवरील अप आणि डाउन लोकलफेऱ्या रद्द राहणार आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.