IND vs NZ 3rd T20 : टी-२० मालिका विजयाची मोहीम आजच फत्ते? न्यूझीलंडविरुद्ध आज तिसरा सामना; ईशानच्या फॉर्ममुळे संजू अडचणीत...
esakal January 26, 2026 12:46 AM

India get a chance to seal the T20 series against New Zealand : टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा आता मोजक्याच दिवसांवर आलेली असताना न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका विजयाची मोहीम आज फत्ते करण्याची संधी आहे. पाच सामन्यांतील तिसरा सामना आज होत असून भारतीय धडाकेबाज कामगिरी करीत आहेत. फलंदाजीतील क्षमता भारताची ताकद वाढवत आहे. म्हणूनच शुक्रवारी झालेल्या सामन्यात अभिषेक शर्मा शून्यावर बाद झालेला असताना आणि दोन बाद सहा अशी अवस्था झालेली असतानाही भारताने २०९ धावांचे आव्हान २८ चेंडू शिल्लक ठेवून पार केले होते. यावरून भारतीय फलंदाजी एका खेळाडूवर अवलंबून नाही, हे सिद्ध झाले.

असे असले तरी विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत संघ व्यवस्थापनाला अंतिम संघरचना कशी असेल, हे निश्चित करायचे आहे. पुनरागमन करणाऱ्या ईशान किशनने दुसऱ्या सामन्यात ३२ चेंडूंत ७६ धावांची घणाघाती खेळी साकार केली. त्यामुळे सलामीला खेळणारा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनवर दडपण वाढले आहे. तिलक वर्मा तंदुरुस्त झाला आणि विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघात परतला तर सॅमसनला जागा खाली करावी लागेल. सॅमसनसाठी संधी निघून जात आहे, त्यामुळे आता आजच्या सामन्यात आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागणार आहे.

IND vs NZ, Video: हर्षित राणाच्या 'गेम चेंजर' विकेट्स! भारताविरुद्ध विक्रमी भागीदारी करणाऱ्या सलामीवीरांना पाहा कसं केलं आऊट

सॅमसनचे संघातले स्थान निश्चित करून त्याला सलामीला खेळवण्यासाठी शुभमन गिलला टी-२० प्रकारातून वगळण्यात आले; परंतु आता सॅमसनच धावांसाठी झगडत आहे. अधिक वेगात येणाऱ्या चेंडूंसमोर सॅमसन मिडऑफ परिसरात झेल देऊन बाद होत आहे. गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो पाच वेळा वेगवान चेंडूंसमोर बाद झाला, यातील सलग तीन वेळ त्याची विकेट जोफ्रा आर्चरने काढली होती.

न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेत त्याला १० आणि सहा धावाच करता आल्या आहेत. पहिल्या सामन्यात कायले जेमिन्सन तर दुसऱ्या सामन्यात मॅट हेन्रीकडून बाद झाला. समोर येणारा वेगवान चेंडू आणि बॅट स्पीड याचा मेळ बांधण्यास सॅमसन अपयशी ठरत आहे. त्यामुळे तो हलके फटके मारून बाद होत आहे, असे त्याच्या बाद होण्याचे विश्लेषण भारताचे माजी फलंदाज डब्ल्यू. व्ही. रामन यांनी केले आहे. यष्टीरक्षणातही सॅमसनकडून अधूनमधून सोप्या चुका होत आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात अर्शदीपचा लेगसाइडचा यॉर्कर चेंडू सॅमसनला अडवता आला नाही. परिणामी, तो वाईड चौकार गेला आणि न्यूझीलंडला दोनशे धावांचा टप्पा पार करता आला होता.

IND vs NZ 2nd T20I: भारतीय गोलंदाजांनी फास आवळला! न्यूझीलंडच्या फलंदाजांसाठी 'चतुराई'ने सापळा रचला; सामना क्षणात फिरला कर्णधार सूर्यकुमारला सापडलेला सूर

भारतीय संघासाठी मोठा दिलासा देणारा ठरला आहे. प्रदीर्घ काळापासून तो अपयशी ठरत आहे. गेल्या २३ सामन्यांत त्याला अर्धशतक करता आले नव्हते; परंतु शुक्रवारी झालेल्या सामन्यात त्याने ३७ चेंडूंत नाबाद ८२ धावांची खेळी साकार केली. भारताकडे आता अभिषेक नायर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि रिंकू सिंग अशी एकापेक्षा एक सरस स्फोटक शैली असलेल्या फलंदाजांची फळी आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही भारतीय संघाचे पारडे निश्चितच जड असेल; मात्र गोलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे.

स्वतःच्याच गोलंदाजीवर चेंडू अडवताना बोटाला दुखापत झालेला अक्षर पटेल दुसऱ्या सामन्यात खेळू शकला नव्हता. विश्वकरंडक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अक्षरला खेळवण्याचा धोका पत्करला जाणार नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात कुलदीप यादवला संधी मिळाली होती. चार षटकांत ३५ धावा देत त्याने दोन विकेट मिळून विश्वास सार्थ ठरवला होता. आता आत्मविश्वास कायम ठेवण्यासाठी त्याच्याकडून अजून चांगली कामगिरी अपेक्षित आहे.

वास्तविक दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडकडून वेगवान फलंदाजी सुरू असताना कुलदीप आणि हर्षित राणा यांनी डावाच्या मध्यावर ब्रेक लावले होते; परंतु डावाच्या सुरुवातीला अर्शदीपची गोलंदाजी फारच महागडी ठरली होती. त्याने पहिल्या दोन षटकांत ३८ धावा दिल्या होत्या. न्यूझीलंडसमोर मालिका गमावण्याची स्थिती निर्माण झालेली असताना त्यांच्याकडून उद्याच्या सामन्यात जोरदार प्रतिकाराची शक्यता आहे. त्यांच्याकडे डेव्हन कॉनवे आणि टीम सैफार्ट असे आक्रमक सलामीवीर आहेत तर मधल्या फळीत ग्लेन फिलिप्स आणि डॅरेल मिचेल असे फलंदाज आहेत, त्यामुळे भारतीय गोलंदाजांना सावधच राहावे लागणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.