बॉक्स ऑफिस गाजवलं, 'बॉर्डर 2' चित्रपटाची रविवारी 12 पर्यंत रेकॉर्ड ब्रेक कमाई, धुरंधर चित्रपटाचा रेकॉर्ड धोक्यात?
Tv9 Marathi January 26, 2026 12:46 AM

Border 2 Box Office Day 3 : वॉर-अ‍ॅक्शन चित्रपट ‘बॉर्डर 2’ ने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सनी देओल स्टारर या देशभक्तीने भरलेल्या चित्रपटाने प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळवत इतर चित्रपटांना, अगदी ‘धुरंधर’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाला देखील, मागे टाकले आहे. रिलीजच्या अवघ्या दोन दिवसांतच या चित्रपटाने दमदार कमाई केली असून, तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी थिएटर्समध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

इतकेच नाही तर रविवारी सकाळच्या शोमध्ये ‘बॉर्डर 2’ ने मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. जी आतापर्यंतची सर्वाधिक कमाई मानली जात आहे. यावरून चित्रपटाबाबतचा उत्साह किती प्रचंड आहे हे स्पष्ट होत आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाची कमाई

ट्रेड आकडेवारी देणाऱ्या वेबसाईट सॅकनिल्क (Sacnilk) नुसार, पहिल्या दिवशी ‘बॉर्डर 2’ ने 30 कोटी रुपयांची जबरदस्त ओपनिंग केली. दुसऱ्या दिवशी, म्हणजे शनिवारी चित्रपटाचे कलेक्शन सुमारे 36.5 कोटी रुपयांंची कमाई केली. या दोन दिवसांमध्ये भारतात ‘बॉर्डर 2’ ने एकूण 66 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

तिसऱ्या दिवसाची कमाई थक्क करणारी

Border 2 Box Office Day 3 संदर्भात सॅकनिल्कच्या डेटानुसार, रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत चित्रपटाने 5.63 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण कलेक्शन सुमारे 72 कोटींवर पोहोचले आहे. अंतिम आकडेवारी रात्री 10 वाजता समोर येणार आहे.

सॅकनिल्कनुसार, तिसऱ्या दिवशी सकाळच्या शोमध्ये मोठ्या प्रमाणात या चित्रपटाने कमाई केली आहे. हा आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा आहे. सध्याचा ट्रेंड पाहता, रविवारी चित्रपटाची कमाई दुसऱ्या दिवसापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आजच 100 कोटी क्लबमध्ये एन्ट्री?

प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरन आदर्श यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, जबरदस्त पॉझिटिव्ह वर्ड ऑफ माउथच्या जोरावर ‘बॉर्डर 2’ ने शनिवारी बॉक्स ऑफिसवर 26.46% वाढ नोंदवली आहे. रविवारी हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. तसे झाल्यास, 2026 मधील 100 कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरेल असं त्यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.