Bhushan Gavai Majha Katta : मी कोणतेही राज्यपाल पद स्वीकारणार नाही. पण बाकीच्या गोष्टींचा अद्याप विचार केला नाही. विचार करायला वेळ मिळाला नाही. आज याबाबत मी काहीच बोलू शकत नाही असे मत निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले. नियतीच्या मनात काय असेल तर हे कोणाला माहीत नसते असे भूषण गवई म्हणाले. एकदा सरन्यायाधिश झाल्यानंतर एखाद्या राजकीय पक्षांशी संबंध जोडण्यात चुकीचे काही नाही असे गवई म्हणाले. निवृत्तीनंतर अनेक न्यायाधिशांना राजकीय पक्षांकडून ऑफर येतात. अनेकजण पक्षामध्ये प्रवेश करतात, काहीजण राज्यपाल होतात तर काहीजण राज्यसभेवर जातात. तुम्हाला अशी संधी मिळाली तर काम करणार का? याबाबत प्रश्न विचारल्यावर गवई बोलत होते.
प्रत्येकाला एक विचारधारा असते. मी जरी जज झालो तरी माझ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संस्कार माझ्या वडिलांनी केले. रिपब्लिकन चळवळीचे संस्कार झाले. बाबासाहेबांच्या राजकीय आणि आर्थिक सामाजिक विचारांमुळं मला वेगळं करण्याची संधी मिळाल्याचे भूषण गवई म्हणाले. मी ज्या विचारांनी पुढे गेलो त्यासंदर्भात काही केलं तर पण घेईल असे नाही असेही गवई म्हणाले. सध्या माझ्या डोक्यात काहीच नाही असे भूषण गवई म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे देशाला राज्यघटना दिली. यामध्ये राजकीय, सामाजिक आणि आर्थिक समानतेचा विचार त्यांनी दिली. मी नेहमीच भाषणात सांगतो की, या देशामध्ये राजकीय समानता दिली आहे. पण सामाजिक आणि आर्थिक समानतेचं काय? या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक राजकीय समानता आणत नाहीत तोपर्यंत या देशात खऱ्या अर्थानं लोकशाही येणार नाही असे आंबेडकर म्हणाले होते. ही परिस्थिती अशीच राहीली तर पत्त्याप्रमाणे लोकशाही ढासळेल असे आंबेडकर म्हणाले होते असे भूषण गवई म्हणाले.
वडिलांकडून अनेक गोष्टी शिकलो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणाच चांगलं करता येत असेलत चांगल कर पण चुकूनही कोणाचे नुकसान करु नको. आयुष्यात मी ते करण्याचा प्रयत्न केला आहे. मनापासून समाजासाठी काहीतरी करावं असं वडिलांना वाटत होते असे गवई म्हणाले. आईकडून कष्ट करण्याची प्रेरणा मिळाली.