Anjali Arora Boyfriend: सोशल मीडियावर ‘कच्चा बादाम’ गाण्यावर व्हायरल झालेली अंजली अरोराचा बॉयफ्रेंड आकाश संसनवाल याला उत्तर प्रदेशातील मेरठ येथे पोलिसांनी अटक केली आहे. परतापुर काशी टोल प्लाझा परिसरात पोलिसांनी केलेल्या तपासणीदरम्यान आकाशच्या गाडीवर भारतीय संसद – पूर्व सदस्य (Ex-MP) असा खोटा स्टीकर लावला होता. या प्रकरणी पोलिसांनी फसवणूकीसह इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली नंबर असलेली स्कॉर्पियो कार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी ती थांबवली. वाहनावर लावलेला एक्स-एमपी स्टीकर अधिकृत नसल्याचे तपासात स्पष्ट झाले. चौकशीदरम्यान हा स्टीकर नियमबाह्य आणि फसवणुकीच्या उद्देशाने वापरण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी आकाश संसनवालला ताब्यात घेतले. त्यानंतर संबंधित कार सीज करण्यात आली. आकाशला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Yashvardhan Ahuja: गोविंदाचा लेक करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू; 'या' अभिनेत्रीसोबत चित्रपटाच्या शूटिंगला केली सुरुवातया कारवाईदरम्यान पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात फक्त आकाशच नव्हे तर इतर चार जणांनाही अटक करण्यात आली आहे. टोल प्लाझावर तपासणी सुरू असताना काही वाहनचालकांनी पोलिसांना चकवा देण्याचा किंवा टोल न देता पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत दोन स्कॉर्पियो आणि दोन थार अशा एकूण चार गाड्या अडवून तपासासाठी ताब्यात घेतल्या. या सर्व वाहनांची सखोल चौकशी सुरू आहे.
Actor Arrested: 'धुरंधर' फेम अभिनेत्याला अटक; घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपयाशिवाय, टोल चेकिंगदरम्यान खोटे व्हीआयपी पास, लाल बत्ती आणि इतर अधिकृत आभास साहित्य वापरणाऱ्या वाहनांवरही पोलिसांनी कडक कारवाई केली. या मोहिमेत अंदाजे आठ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून काही वाहने सीज करण्यात आली आहेत.
आकाश संसनवाल हा सोशल मीडिया क्रिएटर असून इंस्टाग्रामवर त्याचे मोठे फॉलोअर्स आहेत. तसेच ते काही राजकीय स्वरूपाची पेजेसही चालवतात. अटक झाल्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी काही राजकीय लोकांना संपर्क करण्यात आल्याची माहिती स्थानिक वृत्तांतात नमूद करण्यात आले आहे. मात्र पोलिसांनी कोणताही दबाव न घेता कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर ‘कच्चा बादाम’मुळे चर्चेत आलेल्या अंजली अरोराचे नाव पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली असून, या अटकेवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.