IND vs NZ : संजू सॅमसनने 30 मिनिटं जे काही केलं त्यामुळे फॉर्मात परतणार! प्रशिक्षकही म्हणाला…
Tv9 Marathi January 28, 2026 08:45 AM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. टीम इंडियाने या स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतून त्याची प्रचितीही आली आहे. पाच सामन्यांची टी20 मालिका सुरुवातीच्या तीन सामन्यात भारताने 3-0 ने जिंकली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव यालाही सूर गवसला आहे. पण सलामीला फलंदाजीला येणाऱ्या संजू सॅमसनला काही सूर गवसत नाही. त्यामुळे चिंतेचा विषय ठरला आहे. संजू सॅमसनने तीन सामन्यात फक्त 16 धावा केल्या आहेत. तिसऱ्या सामन्यात त्याला खातंही खोलता आलं नव्हतं. त्याला प्लेइंग 11 मधून बाहेर ठेवण्याची मागणी आता जोर धरत आहे. त्याच्या ऐवजी इशान किशनला ओपनिंगला पाठवण्याची चर्चा रंगली आहे. पण पुढच्या सामन्यात संजू सॅमसनवरील शुक्लकाष्ठ दूर होईल अशी आशा आहे.

वर्ल्डकप स्पर्धा तोंडावर असल्याने संघ व्यवस्थापन प्लेइंग 11 मध्ये फार काही बदल करणार नाही. म्हणजेच संजू सॅमसनवर विश्वास टाकला जाईल. चौथ्या टी20 सामन्यापूर्वी भारताचा गोलंदाज प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कलने सॅमसनला आत्मविश्वास मिळवण्यासाठी एक खेळी खूप आहे. मॉर्ने मॉर्केलने सांगितलं की, ‘संजू सॅमसन आत्मविश्वास आणि फॉर्म परत मिळवण्यासाठी फक्त एक डाव दूर आहे. आमच्यासाठी वर्ल्डकप दिशेने कूच करताना खेळाडूंनी योग्य वेळी चांगली खेळी करणं आवश्यक ठआहे. तो चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण घेत आह आणि चांगले शॉटही खेळत आहे.’ संघ व्यवस्थापन संजू सॅमसनकडे लक्ष ठेवून आहेत. पण त्याची एक खेळी या मालिकेत येईल की टी20 वर्ल्डकप स्पर्धेत हे सांगणं कठीण आहे.

संजू सॅमसनने 27 जानेवारीला सराव शिबिरात भाग घेतला. या शिबिरात भाग घेणं अनिवार्य नसतं. पण संजू सॅमसनने भाग घेतला. त्याने जवळपास 30 मिनिटं नेटमध्ये सराव केला. यावेळी त्याला अक्षर पटेल आणि वरूण चक्रवर्तीने गोलंदाजी केली. यावेळी त्याला काही अडचणही आली. पण काही काळ काढल्यानंतर त्याच्या शैलीत फटकेबाजी केली. आता 30 मिनिटांच्या सरावातून काय निघतं हे सामन्यात दिसून येईल. 28 जानेवारीला विशाखापट्टणममध्ये चौथा टी20 सामना होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.