Arijit Singh Retirement : अरिजीत सिंगनं गाणं सोडलं नाही, रिटायरमेंटनंतरही आपल्या मधुर आवाजाने चाहत्यांना लावणार याड
Saam TV January 28, 2026 12:45 PM

अरिजीत सिंगने प्लेबॅक सिंगिंगमधून रिटायरमेंट घेतली आहे.

अरिजीत सिंगच्या रिटायरमेंटच्या घोषणेनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

रिटायरमेंटनंतरही अरिजीत सिंगचा मधुर आवाजाने चाहत्यांना ऐकू येणार आहे.

कालपासून सर्वत्र फक्त अरिजीत सिंगची चर्चा पाहायला मिळत आहे. अरिजीत सिंगच्या एका निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 27 जानेवारी 2026 ला रात्री अरिजीत सिंगने एक पोस्ट केली. ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. त्याने प्लेबॅक सिंगिंगमधून रिटायरमेंट घेतली आहे. ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली, ज्यामुळे त्यांचे चाहते निराश झाले. चाहत्यांना असे वाटू लागले की, ते अरिजीतची गाणी आता ऐकणार नाहीत. पण तसे नाही. अरिजीत सिंग रिटायरमेंटनंतरही गाणे गाणार आहे. चाहत्यांना अरिजीतचा आवाज ऐकू येणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Harshvardhan Rane (@harshvardhanrane)