अजित पवारांच्या विमानाचं पहिलं लँडिंग रद्द, दुसरा प्रयत्न अयशस्वी ठरला, अपघातापूर्वीचा फ्लाईट रडारचा फोटो समोर
मृत्युंजय सिंह January 28, 2026 03:43 PM

Ajit Pawar Death मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं बारामती येथील विमान अपघातात निधन झालं.मुंबईहून अजित पवार बारामतीला निघाले होते. बारामतीत विमानाचं लँडिंग करताना ही दुर्घटना घडली. अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळावरील लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याचं फ्लाईट रडारच्या इमेजवरुन दिसून येतं. त्यानंतर दुसरा प्रयत्न करण्यात आला अपयशी ठरला आणि विमानाचा अपघात झाला. यात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला.

Ajit Pawar News : अजित पवारांच्या विमानाचा फ्लाईट रडारचा फोटो समोर

अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते त्या विमानाचा बारामतीत अपघात झाला. अजित पवार VSR या कंपनीच्या प्रायव्हेट जेटचा वापर करत होते. या विमानाच्या हवाई प्रवासाचा फ्लाईट रडारचा फोटो समोर आला आहे. त्यानुसार अजित पवार यांच्या विमानानं बारामती विमानतळावरील रनवेवर उतरण्यापूर्वी एक फेरी मारली. तज्ज्ञांच्या मते फ्लाईट रडारवर हिरव्या रंगाची रेषा दिसून येते म्हणजे विमान थेट रनवेवर उतरण्याऐवजी एक फेरी मारुन  दुसऱ्यांदा रनवे सोबत अलाईन करण्याचा प्रयत्न करत होते. याचा अर्थ पायलटनं विमानाचं लँडिंग पहिल्यांदा रद्द केलं होतं. त्यानंतर विमान दुसऱ्यांदा रनवेवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

विमान अपघाताची संभाव्य कारणं?

  • पायलटला रनवे व्यवस्थित पाहायला न मिळणं
  • वेगवान हवा किंवा हवेचे ढग
  • विमान योग्य अँगलवर नसणं किंवा स्पीडमध्ये नसणं,
  • तांत्रिक बिघाड
  • रनवेवरील अडथळा  

इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमचा अभाव

बारामती सारख्या छोट्या विमानतळावर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम नसते. यामुळं पायलटला विमान विझ्युअल्स आणि मॅन्युअली अलायनमेंट करावी लागते. यासाठी मोठ्या फेऱ्या आवश्यक असतात. इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम ही रेडिओ आधारित लँडिंग सिस्टीम असते. जी पायलटला दृश्यमानता कमी असताना (धुके, पाऊस आणि रात्रीच्या वेळी) रनवेवर लँडिंगसाठी मदत करते. आयलएएसमुळं पायलटला लेफ्ट राईट अलायनमेंट आणि वरील आणि खालील बाजूचा योग्य अँगल मिळतो. ILS उपलब्ध नसल्यास पायलटला विझ्युअल अप्रोचचा वापर करावा लागतो. पायलटला त्यांच्या डोळ्यांनी रनवे ओळखावा लागतो आणि विमान अलाईन करावं लागतं. 

अजित पवारांच्या विमानाच्या फ्लाईट रडारवरील डेटानुसार पायलटनं घेतलेलं मोठं वळण यातून स्पष्ट होतं की रनवे विझ्युअली ठीकपणे अलाईन झाली नाही. यासाठी लँडिंगचा दुसरा प्रयत्न केला गेला.  

VSR कंपनीच्या विमानाचा 3 वर्षात दुसऱ्यांदा अपघात

VSR कंपनीच्या विमानाचा 3 वर्षात दुसऱ्यांदा अपघात झाला आहे. 2023 मध्ये देखील याच कंपनीच्या VT DBL या विमानाचा मुंबई एयरपोर्टवर अपघात झाला होता, ज्यात विमानाचे भाग निखळले होते. सुदैवाने त्यावेळी कोणाच्याही मृत्यू झाला नाही पण काही जण जखमी झाले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या अपघातांची चौकशी व्हावी असे सांगितले आहे. VSR कंपनी बंबारडियर कंपनीचे लियरजेट 45 XR हे विमान वापरत होते. आज आणि तीन वर्षापूर्वी देखील जो अपघात झाला त्यात असेच विमानाचे मॉडेल होते. त्यामुळे विमानाच्या मेंटेनंस मध्ये काही चुका होत्या का ? ही कंपनी जास्तीत जास्त प्राइवेट जेट ऑपरेट करते आणि सर्व VVIP प्रवाशांना सुविधा देते, त्यामुळे जास्तनफा मिळवण्याचा नादात सुरक्षिततेत काही तडजोड केली का ? याचा देखील तपास होणे गरजेचे आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.