पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात (Ajit Pawar Baramati Plane Crash) झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये येत असताना अजित पवारांचा हा अपघाती मृत्यू झाला. यावेळी नवी दिल्लीत असलेल्या शरद पवारांनी थेट बारामती गाठली आणि हेलिकॉप्टरमधून उतरताच हा अपघात कसा झाला याची माहिती घेतली.
शरद पवार बारामती विमानतळावर पोहोचताच त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांकडून माहिती घेतली. रन वेवर असतानाच शरद पवारांनी ही माहिती घेतली. अजितचं विमान कसं आणि कुठे कोसळलं असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर रन वे ज्या ठिकाणी संपतो त्याच्या आधी एक किमी विमानाचा अपघात झाला. त्या ठिकाणी असलेल्या बाजूच्या खोलगट भागात हा अपघात झाल्याची माहिती शरद पवारांना देण्यात आलं.
शरद पवार यावेळी काहीसे भावुक झाल्याचं दिसून आलं. अजित पवारांच्या अकाली जाण्यामुळे पवार कुटुंबीयांचे न भरणारी हाणी झाल्याचं म्हटलं जातंय. यावेळी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या अश्रूचा बांध फुटल्याचं दिसून आलं.
1. सकाळी 8.10 मिनिटं
मुंबईतून लियरजेट 45 XR विमानाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीकडे उड्डाण झालं. त्यामध्ये अजितदादांसह पाच जणांचा समावेश होता.
2. सकाळी 8.40 मिनिटं
विमान बारामती एअरस्ट्रीपच्या अगदी जवळ होतं, त्यावेळी विमानात काही तांत्रिक बिघाड झाला.
3. सकाळी 8.46 मिनिटं
तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि बारामतीतील गोजुबावी परिसरातील शेतात विमान कोसळलं. त्यामध्ये अजित पवारांसह सर्व जणांचा मृत्यू झाला.
ही बातमी वाचा: