Pune Mayor Selection: अखेर ठरलं! पुण्याचा महापौर 'या' दिवशी होणार जाहीर; नेमकी काय चाललीत खलबतं?
Sarkarnama January 28, 2026 06:45 PM

Pune Mayor Selection : पुणे महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. तसंच महापौरपदाचं आरक्षणही जाहीर झाल्यानं आता संभाव्य नावं समोर आली असली तरी महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडं सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. पण आता ही प्रतिक्षाही संपली असून ११ फेब्रुवारी रोजी महापौरपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होऊ शकते, असं सुत्रांकडून कळतं आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! सातारा गॅझेट लागू होण्याची शक्यता; लवकरच निघणार आदेश?

पुण्याचा नवा महापौर ११ फेब्रुवारीला निवडला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांची आज गटनेता निवडण्यासाठी महत्त्वाची बैठक होत आहे. महापौरपदासाठी रंजना टिळेकर, मानसी देशपांडे, ऐश्वर्या पठारे, रत्ना सातव, मंजुषा नागपुरे यांची नावं चर्चेत असून, कालच भाजप नेत्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

Akola: काठावरच्या भाजपला शरद पवारांचा पाठिंबा; अकोल्यात सत्तेचा मार्ग मोकळा! महापौर अन् उपमहापौरांच्या नावावरही शिक्कामोर्तब

दरम्यान, पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी महिला खुला गट यासाठी आरक्षण जाहीर झालं आहे. त्यामुळं भाजपच्या ज्या पुरुष नगरसेवकांची नाव आधी चर्चेत होती, ती नावं देखील मागे पडली आहेत. यामध्ये गणेश बीडकर, धीरज घाटे, श्रीनाथ धमाले, किरण दगडे पाटील, राजेंद्र शिळीमकर या नावांचा समावेश होता. पण महिला आरक्षण पडल्यानं भाजपच्या या सर्व जुन्या नगरसेवकांचा पत्ता कट झाला आहे.

Raj Thackeray: "आज बाळासाहेब नाहीत तेच बरंय"; राज ठाकरेंनी का व्यक्त केली उद्विग्नता?

पण आता महापौर निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. त्यासाठी चर्चेत असलेल्या महिला नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली होती. पण भाजपच्या धक्कातंत्राच्या स्वभावानुसार, आयत्या वेळेला भलतंच नावही समोर येऊ शकतं. त्यामुळं आता ११ फेब्रुवारी रोजीच पुण्याचा महापौर कोण होणार? यावर शिक्कामोर्तब होईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.