रायगड जिल्ह्यातील ZP निवडणुकीत मोठा राजकीय ड्रामा
ठाकरे सेनेच्या उमेदवाराने अर्ज माघे घेतल्याने वाद
भाजपवर उमेदवार पळवण्याचा शेकापचा आरोप
रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी पनवेल तहसील कार्यालयात 'शेकाप'च्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. ठाकरे सेना पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतल्याने शेकापच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. भाजपने उमेदवार ‘पळवून’ नेल्याचा आरोप शेकापनं केलाय.
Maharashtra Politics: ऐन ZP निवडणुकीत ठाकरे सेनेला मोठा धक्का; माजी आमदाराने पक्ष सोडला, कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेशआदई पंचायत समिती गणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उमेदवार अनिता डांगरकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यावरून शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आक्रमक होत कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी तातडीने हस्तक्षेप करत वातावरण शांत केले.
त्यानंतर पोलीस निरीक्षकांच्या दालनात शेकाप नेते, संबंधित उमेदवार आणि संबंधित घटकांची बैठक पार पडली. बराच वेळ चाललेल्या चर्चा आणि कायदेशीर प्रक्रियेनंतर अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिता डांगरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
Maharashtra Politics: राजकारणात मोठी घडामोड; बार्शीनंतर आणखी एका ठिकाणी दोन्ही शिवसेना एकत्र,भाजपचं वाढलं टेन्शनआदई पंचायत समिती मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून शेकापचे विलास फडके रिंगणात आहेत. मात्र याच मतदारसंघातून ठाकरे गटाकडून अनिता डांगरकर यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आघाडीचा धर्म पाळण्यासाठी डांगरकर यांनी अर्ज मागे घ्यावा, अशी भूमिका शेकापने सुरुवातीपासून घेतली होती.
दरम्यान अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी डांगरकर या भाजपच्यासंपर्कात होत्या. भाजपनेच त्यांना अर्ज मागे घेण्यापासून रोखलं आणि ‘पळवून’ नेल्याचा संशय शेकापने व्यक्त केला. डांगरकर या वेळेत तहसील कार्यालयात पोहोचू नयेत, यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू असल्याचा आरोप शेकापचे उमेदवार विलास फडके आणि महिला आघाडीच्या नेत्या तेजस्विनी घरत यांनी केला.
तहसील कार्यालयात आंदोलन करताना शेकापच्या कार्यकर्त्यांनी एक वाहन अडवल. तसेच जोरदार घोषणाबाजी केल्या. यामुळे तणाव निर्माण झाला. भाजपचे कार्यकर्ते प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित नसले, तरी भाजपच्या पाठिंब्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप शेकापकडून करण्यात आलाय.