मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. मुंबईहून बारामतीकडे येताना ही धक्कादायक घटना घडली. बारामती विमानतळावर लँडिंग होताना तांत्रिक बिघाड झाला आणि हा अपघात झाला. त्यामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरल्याचं दिसून येतंय. अशात एका ज्योतिष्याचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याने अजित पवारांच्या निधनाची भविष्यवाणी 25 दिवस आधीच वर्तवली असल्याची चर्चा सुरू आहे.
अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे महाराष्ट्राला धक्का बसल्याचं चित्र आहे. अजित पवारांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी देशातील बडे नेते उपस्थित राहणार आहेत.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक स्वयंघोषित ज्योतिषी भारतात विमान अपघाताची भविष्यवाणी करताना दिसत आहे. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये भारतात एक विमान अपघात होईल. भाकीत करणं माझं काम आहे. तुम्हाला हे थांबवता येऊ शकेल तर थांबवा असं तो ज्योतिष म्हणताना दिसतोय.
View this post on Instagram
हा व्हिडीओ 2 जानेवारी रोजीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. या ज्योतिष्याने अजितदादांच्या निधनाची भविष्यवाणी 25 दिवस आधीच केली होती अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
astrologrankittyagiofficial नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या या व्हिडीओला लाखो व्ह्यूज आणि अनेक लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडिया वापरकर्ते व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, 'भाकित बरोबर ठरले.' तर दुसऱ्याने लिहिले, 'म्हणजे मृत्यू 25 दिवस आधीच कळला होता.'