Ajit Pawar Plane crash :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा प्रफुल्ल पटेलांना फोन, अजित पवार यांच्या अत्यंसंस्काराबाबत घेतली माहिती  
निलेश बुधावले, एबीपी माझा January 28, 2026 09:13 PM

Ajit pawar plane crash :   राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमानाचा अपघातात (Ajit Pawar Baramati Plane Crash)  मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये येत असताना अजित पवारांचा हा अपघाती मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व बडे नेते बारामतीत दाखल झाले आहेत. उद्या सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थीवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. उद्याच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन उपस्थित राहणार आहेत. 

विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. उद्या सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन उपस्थित राहणार आहेत. अंत्यसंस्कारासंदर्भात माहिती घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना फोन केला आहे. फोनवरुन अमित शाह यांनी अंत्यसंस्काराबाबत माहिती घेतली आहे.  सध्या प्रफुल्ल पटेल हे बारामतीत शरद पवार यांच्यासोबत आहेत.

Baramati Plane Crash Timeline : अपघात नेमका कसा झाला?


1. सकाळी 8.10 मिनिटं

मुंबईतून लियरजेट 45 XR विमानाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीकडे उड्डाण झालं. त्यामध्ये अजितदादांसह पाच जणांचा समावेश होता.

2. सकाळी 8.40 मिनिटं

विमान बारामती एअरस्ट्रीपच्या अगदी जवळ होतं, त्यावेळी विमानात काही तांत्रिक बिघाड झाला.

3. सकाळी 8.46 मिनिटं

तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि बारामतीतील गोजुबावी परिसरातील शेतात विमान कोसळलं. त्यामध्ये अजित पवारांसह सर्व जणांचा मृत्यू झाला.

Ajit Pawar Plane Crash : विमानात कोण कोण होते?

अजित पवार
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक

Ajit Pawar Plane Crash Timeline : विमान अपघाताचा घटनाक्रम

पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी होती.  
बारामतीचे विमानतळ लहान आहे आणि त्याच्याकडे ILS (Instrument Landing System) सुविधा नाही.  
त्यामुळे पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली.  
विमानाने रनवेवर थेट प्रवेश केला नाही, तर मोठा वळसा घेतला.  
याचा अर्थ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द (aborted) केला गेला.  
धुक्यात रनवेवर (align) करणे कठीण झाले.  
दुसरा लँडिंग प्रयत्न केला गेला.  
याचवेळी पायलटने MAYDAY कॉल जारी केला.  
DGCAच्या सूत्रांनुसार, हे टेबल-टॉप रनवे आहे.  
लँडिंगदरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले.  
सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचा तोल गेला.  
रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले.
विमान जमीनीवर आदळल्यावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले.
 त्यानंतर विमानात भीषण आग लागली.
आगीमुळे तात्काळ बचावकार्य शक्य झाले नाही.
अपघाताचा तपास चालू आहे, DGCA अहवालानंतर अंतिम कारण निश्चित होईल.

Ajit Pawar Plane Crash: 'सूर्याच्या साक्षीने दादांचे काम सुरू व्हायचे अन्...' अजितदादांच्या अपघाती निधनावर रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.