Ajit Pawar Death Live Updates : 'अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील युवा नेत्यांचं प्रचंड नुकसान'
Sarkarnama January 28, 2026 07:46 PM
Yogesh Kadam : 'अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील युवा नेत्यांचं प्रचंड नुकसान'

'अजितदादा आपल्यातून निघून गेलेत, यावर अजूनही विश्वास बसत नाही. दादांच्या जाण्याने महाराष्ट्रातील युवा नेत्यांचे प्रचंड नुकसान आणि जनतेची मोठी हानी झाली आहे,' अशी प्रतिक्रिया गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. दादांच्या मृत्यूची बातमी ही मन सुन्न करणारी आहे. मनाला खूप वेदना होतात, असेही योगेश कदम यांनी म्हटले.

Sangram Jagtap On Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निधनाने अहिल्यानगरचा पाठीराखा हरपला : आमदार संग्राम जगताप

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाच्या बातमीवर विश्वासच बसत नाही. ही अत्यंत दु:खदायी व धक्कादायक घटना आहे. एक कतर्व्यदक्ष, शिस्तीप्रिय, विकासाचा दृष्टिकोन असलेला तसेच दूरदृष्टी, धाडसी आणि प्रशासनाला योग्य दिशा देणारा लोकनेता आज आपल्यातून गेला आहे. राज्याच्या विकासासाठी त्यांनी जे योगदान दिले ते अत्यंत मौलिक व महत्त्वपूर्ण होते. प्रचंड निर्णयक्षमता आणि निर्भीड असलेल्या अजितदादांनी महाराष्ट्राला दिशा देत राजकारणा पालोकडे जात सर्वसामन्य नागरिक, शेतकऱ्यांसाठी मोठी काम केले. लोकहितासाठी घेतलेले कठोर निर्णय आणि निर्भीड भूमिका हीच त्यांची खरी ओळख होती, अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी अजित पवार यांच्या निधनावर दिली.

Anna Hazare On Ajit Pawar : अजित पवारांचे निधन; अण्णा हजारे म्हणाले, 'शब्द नाहीत...'

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले की, "उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे, ते शब्दात सांगता येणार नाही, अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे. अचानकपणे ही दुर्दैवी बातमी सकाळी येऊन धडकली. दुर्दैवाने या देशाची जनसंख्या ही, समुद्राला आलेल्या भरतीप्रमाणे वाढत चालली आहे, त्यातील अजित पवार सारखी माणसं, अशी जाणं हे देशाचे आणि समाजाची फार मोठी हानी आहे. अजित दादांच्या आत्म्यास ईश्वराने चिरशांती देवो." अजित दादांच्या कामाची पद्धत आणि स्पष्टोक्तेपणावर अण्णा हजारे म्हणाले की, 'अजितदादा यांच्याशी असा थेट राजकीय काही संबंध नव्हता. परंतु कामाच्या निमित्ताने त्यांच्याशी संपर्क आला होता. ते राळेगणला सुद्धा येऊन गेले होते. त्यावेळी ते भेटून गेले होते. समाज हितासाठी आणि देश हितासाठी जे जे शक्य आहे, ते करायला हवे, अशा मताचे अजितदादा होते, हे त्यावेळी त्या भेटीत लक्षात आले.'

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात कडकडीत बंद

उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाळी निधनाने संपूर्ण राज्यसह पिंपरी चिंचवड शहरावर मोठी शोककळा पसरली आहे. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात व्यापारी वर्गानं कडकडीत बंद ठेवलं आहे. त्याचबरोबर शाळा महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

परभणी : १ मताने जय- पराजयाचा निकाल राज्यभर गाजला; आता न्यायालयात आव्हान

परभणी जिल्ह्यात १ मताचा निकाल राज्यभर चांगलाच गाजला होता. पण आता या निकालाला न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे आव्हान देण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक १ ची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी पराभूत उमेदवाराने केली असून येथे पोस्टल मताने उबाठा सेनेचा उमेदवार विजयी झाला होता. तर ७ पोस्टल मते करणाऱ्या मतदारांचे कुठलेही कागदपत्रे निवडणूक विभागाकडे नसने, एका सामान्य मतदाराला पोस्टल मताचा अधिकारासह विजयी उमेदवाराच्या नातेवाईकांना २ वेळा मतदानामुळे ही निवडणूक गाजली होती. पण आता भाजपच्या उमेदवारांनी न्यायालयासह निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करत दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती.

Raigad Ajit Pawar : रायगडच्या इंदापूर बाजारपेठ बंद ठेवत अजितदादांना व्यापाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली

अजित पवार यांच्या निधनाने रायगडच्या इंदापूर शहरात बाजार पेठ बंद ठेवण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर शहर बंद ठेवत व्यापाऱ्यांनी अजितदादांना श्रद्धांजली वाहिली. मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदार संघातील इंदापूर शहर मधील व्यापाऱ्यांनी दुखवटा पाळला.

Ajit Pawar death : अजितदादा पवार यांचं निधन, शोक व्यक्त करत बुलढाणा जिल्हा बंद...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने बुलढाण्यात शोक संवेदना व्यक्त करत, अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करत सर्वपक्षीय नेत्यांनी बुलढाणा शहरासह जिल्हा बंदची हाक दिली. त्यामुळे सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने आस्थापने बंद ठेऊन अजितदादांना आदरांजली वाहिली आहे.

Ajit Pawar death news : सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे अन् पार्थ पवार बारामतीमध्ये दाखल

अजित पवार यांचे विमान अपघाताच्या निधनानंतर दिल्लीला असलेले त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, बहीण सुप्रिया सुळे, पार्थ पवार बारामतीमध्ये दाखल झाले आहेत. हे तिघे बारामती इथल्या रुग्णालयात दाखल होताच, कार्यकर्त्यांना आणखी आक्रोश केला.

शरद पवार बारामतीत दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती परिसरात अपघात झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार दिल्लीहून तातडीने रवाना झाले. त्यांच्या सोबत प्रतिभा पवार या देखील होत्या. दुपारी दीडच्या सुमारास हेलिकॉप्टरने ते बारामतीत दाखल झाले. घटनास्थळी पोहोचताच त्यांनी अपघाताबाबत सविस्तर माहिती घेतली.

पुणे शहर आज आणि उद्या बंद राहणार!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच निधनामुळे महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार आज आणि उद्या पुणे बंद राहणार. तसेच उद्या मार्कटेयार्ड ही राहणार बंद.

आमदार संदीप क्षीरसागर यांची भावनिक पोस्ट.

आमदार संदीप क्षीरसागर यांची भावनिक पोस्ट.

दादा तुम्ही जिल्ह्याला नव्हे तर राज्याला पोरक करून गेलात.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार साहेब यांच्या विमानाला अपघात होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समजली आणि बीड जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला दादा तुम्ही पोरकं करून गेल्याची भावना दाटून आली.

आपल्या धडाकेबाज निर्णय क्षमतेमुळे आपले सर्वांच्या मनात कायम स्थान राहील. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच स्वप्न दादा अर्धवट राहिले. तुमच्या नेतृत्वात दादा सर्वकाही शक्य होते. मला आज शब्द सुचत नाहीत.

शरद पवार बारामतीत दाखल Ajit pawar Death : महाराष्ट्र सरकारने तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर

महाराष्ट्र सरकारने तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी बारामतीला जात आहेत. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

मावळ विधानसभेच्या माजी आमदार श्रीमती रूपलेखाताई ढोरे यांचे निधन

अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रात तीन दिवसाचा दु:खवटा पाळण्यात येणार आहे. आज शासकीय सुटी जाहीर करण्यात आली आहे.

दमदार अन् दिलदार मित्र सोडून गेला: देवेंद्र फडणवीस

विमान अपघातात अजित पवार निधन झाल्याची बातमी समजली, अन् महाराष्ट्रात शोककळा पसरली, अजितदादा लोकनेता होते. महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला नेता होता. संघर्षशील असे नेतृत्व होते, कुठल्याही परिस्थिती मागे न हटणारे व्यक्तिमत्व होते. माझ्यासाठी दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला आहे.

सामाजिक हितासाठी काम करणारा नेता हरपला...: जयकुमार रावल

- महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक हितासाठी काम करणारा नेता हरपला....

- अजित दादांच्या अनुभवाच्या फायदा मला नेहमी झाला आहे....

- महाराष्ट्राच्या कधी न भरून निघणारी हानी झाली आहे.....

- अजूनही विश्वास बसत नाही आहे मात्र आजच्या दिवस अत्यंत दुःखी आणि नुकसानदायक आहे....

 मंत्री जयकुमार रावल अजितदादा मनाने निर्मळ होते. त्यांच्या जाण्याचे मोठा भाऊ गेल्याची भावना आहे- एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन या विमान अपघाताची माहिती घेतली आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या निधनाने बीडची बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी वाईट बातमी! विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू

बारामती येथील विमानतळावर विमान अपघातग्रस्त होऊन यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे बारामतीसह संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.

बारामतीत अजित पवार यांच्या विमानाचा अपघात

बारामतीत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचार सभा होणार होत्या. मात्र त्यापूर्वीच अजित पवारांच्या विमानाचा लँडिंग दरम्यान मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंब्रा शहर तिरंग्याचं आहे आणि तिरंग्याचंच राहणार - जितेंद्र आव्हाड

'कैसे हराया' आणि 'पूर्ण मुंब्रा हिरवा करणार' असं वक्तव्य मुंब्रा येथील एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेखने केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.सहर शेख ही लहाण मुलगी आहे, मी तिच्याकडे लक्ष देणार नाही. पण हे शहर तिरंग्याचं आहे आणि तिरंग्याचंच राहणार, असं म्हणत आव्हाडांनी सहर शेख आणि तिच्या वडिलांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

Solapur News : झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी मर्ज होणार - आमदार राजू खरेंचा दावा

झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी मर्ज होणार असा मोठा दावा मोहोळ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी केला आहे. बारामतीत अजितदादांसोबत आमची बैठक झाली. त्यावेळी जिल्ह्यातील चार आमदार आणि एक खासदारासह दोन्ही राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख बैठकीला उपस्थित होतो. तीन महिन्यांमध्ये निवडणुका होत असल्यामुळे आम्हाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असल्याची घोषणा करता आली नाही. त्या बैठकीत अजित पवारांनी असं विधान केल्याचं राजू खरे यांनी म्हटलं आहे. जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर अधिकृतपणे पवार कुटुंबियांकडून घोषणा होईल. आणि शरद पवार साहेबांची तुतारी आणि पक्ष अजित पवारांच्या पक्षात मर्ज होईल, असा दावा राजू खरे यांनी केला आहे.

अंजली भारतींवर गुन्हा दाखल करा - आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या संदर्भात अत्यंत घृणास्पद आणि हिंसाचारास प्रवृत्त करणारी व महिलांच्या सन्मानाला धक्का देणारी विधाने केल्याप्रकरणी अंजली भारती यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचाकडे केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस कोकणात तर एकनाथ शिंदे सोलापुरात प्रचारसभा घेणार

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी आजपासून राजकीय नेत प्रचार सभा घेणार आहेत. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोकणात तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी, लातूर आणि सोलापुरच्या अक्कलकोटमध्ये सभा घेणार आहेत. तर अजित पवार आज बारामतीत सभा घेणार आहेत.

Palghar Kisan Morcha : किसान मोर्चाच्या मागण्यांना सरकारची मान्यता

अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात राज्य सरकारसोबत सविस्तर चर्चा केली. या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासह मुख्य सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर शिष्टमंडळाने वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मान्य करण्यात आलेल्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करण्याची संपूर्ण हमी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.