Kolhapur political news : (अतुल मंडपे) : येत्या आठवडयाभरातच हातकणंगले तालुक्यात भाजपला खिंडार पडण्याची शक्यता आहे. जेष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले आणि त्यांचे चिरंजिव आळतेचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले आणि त्यांचे कार्यकर्ते उपमुख्यंमंत्री एकनाथ शिंदे गटांत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. यामुळे हातकणंगले सह तालुक्यांतील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. तथापि अरुणराव इंगवले यांचे कनिष्ठ बंधू राजू आणि अमर इंगवले हे मात्र भाजपची साथ सोडण्यास तयार नसल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
२०१४ ला देशात भाजपचे सरकार आले त्यानंतर २०१६ ला इंगवले गटाने भाजपशी युती करत ते भाजपवासी झाले . त्यानंतर त्यांनी भाजपकडून अनेक पदे मिळवत तालुक्यात भाजपचे वर्चस्व राखण्यांत मोठी शिराकास्ता केली. मात्र अलिकडच्या काळात त्यांना इचलकरंजी आणि कोल्हापुरांतून भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित साथ मिळत नसल्याने त्यांनी भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.
महायुतीतील त्यांचे साथीदार शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची गट्टी जमवण्याचे काम खासदार धैर्यशील माने यांनी केले आहे. त्यादृष्टीने त्यांच्या काही बैठका इंगवले यांच्या निवासस्थानी झाल्या आहेत. येत्या एक तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा आहे. त्या दरम्यान, रेंदाळ, रुई, रुकडी येथे त्यांचा रोड शो होणार असून आळते येथे पक्ष प्रवेशाचा कार्यकम होणार आहे.
Kolhapur Election : पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू, पण शब्द दुसऱ्यालाच; महायुतीत इच्छुकांची उघड नाराजीयावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले की, अरुणराव इंगवले आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्या पक्ष प्रवेशाची निश्चिती झाली असून येत्या एक तारखेला त्यांची औपचारिकता पूर्ण होईल याबाबत थेट उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांशी बोलणे झाले आहे.
अरूण इंगवले म्हणाले की, पक्षप्रवेशाची चर्चा सुरू आहे . तथापि त्याबाबत नेमके काहीच निश्चित नाही . लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल.