घोरपडी, ता. २८ : आदर्श माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त नीलेश नांदूस्कर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास संस्थेचे धनंजय मनोहर, संचिता सिन्हा, प्रजित पाणिकर, रश्मी पाणिकर, बाळासाहेब पवार, तानाजी रुके, कैलास दळवी, संतोष घोडके, संस्थापक व कार्याध्यक्ष त्रिंबक बारवकर, मुख्याध्यापक वाल्मीक बारवकर, मुख्याध्यापिका संगीता ताडगे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीतांवर कवायत व लेझीम सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यप्रकारांनी वातावरणात उत्साह निर्माण केला. प्रतिभा पवार यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगून संविधानातील मूल्यांवर प्रकाश टाकला. संजय देसले यांनी सूत्रसंचालन केले. संतोष राऊत यांनी आभार मानले.
स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत, समूह नृत्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून देशप्रेम, शिस्त, एकात्मता आणि संविधानाच्या मूल्यांचा संदेश दिला. या वेळी मुख्याध्यापिका मीना इंगोले, माजी सैनिक राजेंद्र यादव, श्यामकुमार कदम, श्याम वाघमारे, सतीश सोनवणे उपस्थित होते.
बालाजीनगर परिसरात स्थानिक नागरिकांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या वेळी नगरसेविका सुरेखा कवडे, नगरसेविका हिमाली कांबळे, प्रदीप परदेशी, गौरी पिंगळे, हिरालाल परदेशी, नितीन निगडे, विशाल कवडे, मोहसीन शेख आदी उपस्थित होते.