Sadhvi Prem Baisas Suspicious Death: राजस्थानमधील जोधपूर येथील प्रसिद्ध साध्वी प्रेम बैसा यांचं निधन झालं. त्यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झालाय. त्यांना त्यांच्या आश्रमातून उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचे पार्थिव आरती नगर येथील आश्रमात परत नेण्यात आले. दरम्यान, साध्वी प्रेम बैसा यांच्या मृत्यूनंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर झाली. या पोस्टद्वारे त्यांनी न्याय मागितला आहे. प्रेम बैसा यांच्या मृत्यूच्या 4 तासांनंतर ही पोस्ट शेअर झाली आहे. काही महिन्यांपूर्वी प्रैम बैसा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. ज्यात त्यांनी एका पुरूषाला मिठी मारली होती. या व्हिडिओमुळे प्रेम बैसा सोशल मीडियात चर्चेत आली होती. दरम्यान, प्रेम बैसा यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर सोशल मीडियात खळबळ उडाली आहे.
साध्वी प्रेम बैसा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय होत्या. दरम्यान, त्यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर खळबळ उडाली. दरम्यान, प्रेम बैसा यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर झाली. या पोस्टमध्ये, 'न्याय मृत्यूनंतर मिळेल.. जिवंत असताना नाही' त्यांनी असं फोटोला कॅप्शन दिलंय. या पोस्टमुळे या प्रकरणाचे आणखी गूढ वाढले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. परंतु, कुटुंब त्यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशीची मागणी करत आहेत.
View this post on Instagram
जुलै 2025 रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. व्हिडिओमध्ये साध्वी प्रेम बैसा एका पुरूषाला मिठी मारताना दिसली. व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला ब्लँकेट घेऊन खोलीत प्रवेश करते. नंतर एका पुरूषाला प्रेमाने मिठी मारते. हा व्हायरल व्हिडिओ तीन वर्षे जुना असल्याचं म्हटलं जात आहे. हा व्हिडिओ एडिटेड असल्याचंही बोललं जात होतं. व्हिडिओ व्हायरल होताच साध्वी प्रेम बैसा यांनी या व्हिडिओतील पुरूष आपले वडील असल्याचं सांगितलं. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर जोरदार वादविवाद झाला. काहींनी साध्वी प्रेम बैसा यांच्यावर अश्लील टीका केली.
28 जानेवारी 2026 रोजी साध्वी प्रेम बैसा यांना गंभीर अवस्थेत जोधपूर येथील रूग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्या मृत्यूनंतर साध्वी प्रेम बैसा यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर झाली. या पोस्टमध्ये त्यांनी न्यायाची मागणी केली आहे. मृत्यूच्या अगदी चार तासांनंतर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडिओमुळे आलेला तणाव आणि नैराश्याशी मृ्त्यूचा संबंध जोडला जात आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट अद्याप समोर आलेला नाही. त्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल.