मोठी बातमी! सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, 1 तोळ्यासाठी 1 लाख 82 हजार; चांदीनेही गाठला नवा टप्पा
Marathi January 29, 2026 10:25 PM

जळगाव : गेल्या काही दिवसांता सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून दीड लाखाचा टप्पा केव्हाच ओलांडला आहे. मात्र, दीड लाखांवर गेलेलं सोनं आता कमी होईल, नंतर कमी होईल अशी अपेक्षा बाळगून असलेल्या ग्राहकांना सोन्याच्या दराने आणखी एक धक्का दिलाय. कारण, सोन्याच्या (Gold) दरात एकाच दिवसांत तब्बल 14 हजार रुपयांची वाढ झाली आहे. जळगावच्या बाजारात सोने-चांदीमध्ये विक्रमी भाव वाढ झाली असून सोन्याचे दर हे 1 लाख 82 हजारांवर पोहोचले आहेत. तर चांदी प्रति किलो 4 लाख रुपयांवर विक्री केली जात आहे.

सोन्याच्या भावात होणाऱ्या ऐतिहासिक भाव वाढीमागे प्रामुख्याने जागतिक अस्थिरता, मध्यवर्ती बँकांकडून मोठी खरेदी, महागाई, आणि डॉलरच्या तुलनेत कमकुवत झालेला भारतीय रुपया ही प्रमुख कारणे आहेत. तसेच रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास यांसारख्या भौगोलिक तणावांमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे, या कारणामुळे सोने चांदीच्या दरामध्ये सातत्याने भाव वाढ होत आहे. मात्र, यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडलं आहे. आगामी काळात सोने लवकरच दोन लाखांचा टप्पा पार करील, असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तवला आहे. बाजारातील ही तेजीमंदी लक्षात घेता पुढील काही दिवसांत सोने बाजारात ग्राहकांची चांगलीच गर्दी होईल, असे चित्र आहे.

हेही वाचा

1 फेब्रुवारीलाच देशाचा अर्थसंकल्प का सादर केला जातो? नेमकी कोणत्या अर्थमंत्र्यांपासून झाली सुरुवात? जाणून घ्या सविस्तर माहिती

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.