स्टार प्रवाहनंतर अभिनेत्याची झी मराठीच्या मालिकेतही एंट्री; एकाच वेळी दोन लोकप्रिय सिरीयलमध्ये साकारतोय भूमिका
esakal January 30, 2026 04:45 AM

मराठी इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी कलाकारांना बराच संघर्ष करावा लागतो. त्यात काम कमी आणि कलाकार जास्त असल्याने असलेलं काम टिकवणं हेदेखील महत्वाचं ठरतं. अनेक महिने किंवा वर्ष आपण घरी बसलो आहोत, काम मिळत नसल्याची तक्रार अनेक कलाकार करताना दिसतात. अनेक प्रयत्न करूनही काम मिळत नाही. मात्र प्रयत्न करणं सोडायचं नसतं, यश कधीतरी आपलं दार ठोठावतच. असंच काहीसं घडलंय मराठी अभिनेत्यासोबत. २०२५ मध्ये फारसं काम नसलेला अभिनेता आता २०२६ मध्ये चक्क दोन मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिकांत दिसतोय. नुकतीच एक पोस्ट करत त्याने ही माहिती दिलीये. कोण आहे हा अभिनेता?

हा अभिनेता आहे स्वप्नील आजगावकर. झी मराठीवरील 'पारू' मालिकेतून काही दिवसांपूर्वी अभिनेता शंतनू गंगणे याने एक्झिट घेतली होती. या मालिकेत तो 'मोहन ही भूमिका साकारत होता. आता त्याच्याजागी स्वप्नीलची वर्णी लागली आहे. 'पारू' मालिकेत स्वप्नीलची एंट्री झालीये. तर त्यापूर्वीपासूनच तो स्टार प्रवाहावरील नव्याने सुरू झालेली मालिका 'वचन दिले तू मला' मध्ये देखील दिसत आहे. त्यामुळे हे नवीन वर्ष त्याला चांगलं गेलं आहे असं म्हणायला हरकत नाही.

View this post on Instagram

A post shared by Swapnil S (@swapniilsa)