UPI पेमेंट फेल? तरीही कमाई होणार, जाणून घ्या हा फायद्याचा नियम
Tv9 Marathi January 30, 2026 04:45 AM

How to Get Compensation if UPI Payment Fail: सध्या जमान्यात युपीआय ही सर्वात वेगवान आणि सोपं पेमेंट पाठवण्याची पद्धत म्हणून लोकप्रिय आहे. दूध, किराण्यापासून ते ऑनलाईन शॉपिंगपर्यंत प्रत्येक ठिकाणी ग्राहक Google Pay, PhonePe आणि Paytm वा इतर प्लॅटफॉर्मचा वापर करतात. पण अनेकदा पैसा खात्यातून वजा होतो. पण समोरच्या खात्यात जमा होत नाही. याविषयीचा एक नियम सध्या समोर येत आहे. त्यानुसार, जर पैसा खात्यात परत आला तरी ग्राहकाला, युझर्सला वेळेत पेमेंट न केल्याने झालेल्या मनस्तापाविषयी भरपाई मिळण्याचा अधिकार आहे.

पेमेंट फेल झाल्यावर काय होते?

जर UPI चा व्यवहार फेल ठरला आणि पैसे खात्यातून वळते झाले तर ही बँक आणि युपीआय सेवा देणाऱ्या कंपनीची जबाबदारी असते. जर त्यांनी वेळेत ही समस्या सोडवली नाही. म्हणजे साधारणपणे 1 दिवसांच्या आता पैसे परत मिळाले नाही तर मग बँकेसह युपीआय सेवा देणाऱ्या कंपन्यांची जबाबदारी निश्चित होते. अशावेळी युझर्स हे भरपाईला पात्र असतात.

RBI आणि NPCI च्या नियमानुसार जर बँक वा UPI सेवा पुरवठादार निश्चित वेळेत व्यवहाराची पूर्तता करत नाही. तेव्हा बँकेसह संबंधीत कंपनीला युझर्सला नुकसान भरपाई द्यावी लागते. जो पैसा बँकेतून वळता झाला तो तर परत करावाच लागतो. पण भरपाई सुद्धा द्यावी लागते. हा नियम तेव्हाच लागू होतो, जेव्हा स्पष्टपणे बँक, युपीआय सेवा पुरवठादार कंपनी यांची चूक असते.

किती मिळते भरपाई ?

आता युझर्सला किती भरपाई मिळेल असा प्रश्न विचारल्या जातो. तर आरबीआयच्या नियमानुसार, जर निश्चित वेळेत रक्कम, व्यवहाराविषयीचा अडचण, समस्या दूर झाली नाही. पैसे परत खात्यात पाठवल्या गेले नाही तर जितक्या दिवस उशीर झाला. तितकी ही रक्कम वाढते. ही रक्कम थेट युझर्सला बँक अथवा युपीआय कंपनीला द्यावी लागते. ही रक्कम अर्थातच फार मोठी नसते. पण कंपनीच्या हलगर्जीपणाबद्दल हा एकप्रकारचा दंड असतो.

UPI पेमेंट फेल झाल्यावर कुठं करणार तक्रार?

जर तुमच्या खात्यातून पैसे कट झाले. पण ते समोरच्या व्यक्तीला मिळाले नाही आणि तुमच्या खात्यातही एक दिवस उलटून आले नाही, तर तुम्ही बँक आणि युपीआय सेवा पुरवठादार कंपनीविरोधात तक्रार दाखल करू शकता. तुम्ही ट्रँझॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन “Help” वा “Report a Problem” हा पर्याय निवडू शकता. याठिकाणी तुम्हाला UTR क्रमांक वा ट्रॅझॅक्शन ID नमूद करावा लागेल. अर्थात नेटवर्क, इंटरनेट वा तुमच्या मोबाईलच्या समस्येमुळे समस्या आली असेल तर मग भरपाई मिळत नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.