अजित दादा पवार यांना मुरुड ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे भावपूर्णश्रद्धांजली !
esakal January 30, 2026 08:45 AM

अजित पवार यांना मुरुडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे श्रद्धांजली
मुरुड, ता. २९ (बातमीदार) ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आस्कमिक मृत्यूने राज्यावर शोककळा पसरली आहे. दादांना श्रध्दांजली देण्यासाठी मुरुड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुरुड नगर परिषदेच्या प्रांगणात शोक सभेचे आयोजन केले होते. नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आराधना दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.
यावेळी उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत, शहराध्यक्ष संजय गुंजाळ, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दांडेकर, नगरसेवक मनोज भगत, तालुका अध्यक्ष फैरोज घल्टे, अस्लम हलडे, अजित कासार, अविनाश दांडेकर, योगेंद्र गोयजी, दत्ता नाक्ती, तुकाराम पाटील, वासंती उमरोटकर, प्रमोद भायदे, आदेश दांडेकर, रशिद फहीम, प्रमिला माळी, विजय पैर आदींनी अजित दादांना श्रध्दांजली अर्पण केली.
या सभेस तालुक्यातील सर्व स्तरातील कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.