Virat Kohli Instagram Account Suddenly Disappears : भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीचे इंस्टाग्राम अकाउंट गुरुवारी रात्री अचानक गायब झाले. यामुळे त्याच्या लाखो फॉलोअर्सना मोठा धक्का बसला, कारण त्याने सोशल मीडिया सोडत असल्याचे किंवा ब्रेक घेत असल्याचे काहीही पोस्ट केलेली नव्हती. यामुळे आता प्रश्न निर्माण असे निर्माण होत आहे की विराटने स्वतः आपले अकाउंट बंद केले आहे की? त्याचे अकाउंट सस्पेंड केले गेले आहे? .
खरंतर इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत विराटच्या पुढे कोणताही क्रिकेटपटू जास्त नाही; त्याचे तब्बल २७४ दशलक्ष फॉलोअर्स होते. आता, जेव्हा चाहते त्याचे फॉलोअर्स त्याचे अकाउंट शोधत आहेत, तेव्हा त्यांना काहीही दिसत येत नाही. त्यामुळे नेमकं काय झालंय असाच सर्वांना प्रश्न पडला आहे. विशेष म्हणजे विराटकडूनही याबाबत अद्यापपर्यंत काहीही सांगितले गेलेले नाही.
तसं बघितलं तर विराट कोहली सध्या त्याच्या कुटुंबासह लंडनमध्ये राहतो. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्याने कसोटी आणि टी२० क्रिकेटमधून निवृत्तीही घेतली आहे आणि तो टीम इंडियासाठी फक्त एकदिवसीय सामने खेळतो. नुकताच तो न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतात आला होता आणि त्यानंतर तो लगेचच लंडनला परतला देखील.
इतकेच नाही तर सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की विराटसोबत त्याचा भाऊ विकास कोहलीचे इन्स्टा अकाउंट देखील डिअॅक्टिव्ह दिसत आहे. सध्या विराट कोहली, त्याची मॅनेजमेंट टीम किंवा मेटाकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.