पुणे - तुम्ही पर्यटनाला जाण्याचा विचार करत आहात का, पर्यटनासाठी नेमकं कोणते ठिकाण निवडायचे, कसे जायचे, कधी जायचे, पर्यटनांचा अनोखा पर्याय अनुभवावा का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे देणारा आणि मनासारख्या पर्यटनाचा योग जुळवून आणणाऱ्या ‘सकाळ टुरिझम एक्स्पो’ला शुक्रवारी (ता. ३०) प्रारंभ होत आहे. रविवारपर्यंत (ता. १) एक्स्पो खुला असून, कर्वेनगरमधील पंडित फार्म्समध्ये होणार आहे.
एक्स्पोमध्ये एकाच छताखाली जगभरातील आणि देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळांची माहिती आणि बुकिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. जागेवर बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना आकर्षक आर्थिक सवलत मिळणार आहे. यंदाच्या प्रदर्शनात केवळ पारंपरिक ठिकाणेच नाहीत, तर सध्या ‘ट्रेंडिंग’ असलेल्या नवीन ठिकाणांचीही खास दालने असतील.
त्यात स्वित्झर्लंड, पॅरिस, लंडन, अमेरिकेसह चीन, व्हिएतनाम, बाली (इंडोनेशिया), मॉरिशस, मालदीव, दुबई, सिंगापूर, थायलंड आदींचा समावेश आहे. तर, देशांतर्गत पर्यटनासाठी काश्मीर, लेह-लडाख, केरळपासून ईशान्य भारत (सेव्हन सिस्टर्स) आदी विविध पर्याय आहेत.
धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी आंगकोर वट कंबोडिया, चारधाम यात्रा, कैलास मानसरोवर, काशी-विश्वनाथ कॉरिडॉर, अयोध्या राम मंदिर, प्रयागराज आणि दक्षिण भारतातील भव्य मंदिरेही पाहण्याची संधी आहे. वेलनेस, वाइल्ड लाइफ सफारी, हेरिटेज आणि सांस्कृतिक टुरिझमचेही अनेक पर्याय येथे असतील.
एक्स्पोविषयी...
केव्हा : शुक्रवार (ता. ३०), शनिवार (ता. ३१) आणि रविवार (ता. १)
कोठे : पंडित फार्म्स, डी. पी. रस्ता, कर्वेनगर
कधी : सकाळी १०.०० ते रात्री ८.०० पर्यंत.
‘सकाळ टुरिझम एक्स्पो’ नागरिकांसाठी पर्यटन पर्वणी आहे. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चेरी ब्लॉसम जपान, साउथ अमेरिका, मानस सरोवराला जायचे असेल, तर बुकिंग आताच करा. देशांतर्गत पर्यटनासाठी हा एक्स्पो उपयुक्त ठरेल. पर्यटनासाठी आमच्या अनेक ऑफर्स आहेत. आठ मार्चला ‘माय फेअर लेडी’ निघाली आहे, ‘क्रुझ’वर आदेश बांदेकर बरोबर, मग येताय ना ‘केसरी’बरोबर.
- झेलम चौबळ, संचालिका, केसरी टूर्स
‘सकाळ टुरिझम एक्स्पो’चे आम्ही प्रायोजक आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. पर्यटकांसाठी अनेक सहलींचे मुबलक पर्याय माफक दरात उपलब्ध आहेत. देशातील, तसेच परदेशातील नवी ठिकाणेही पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. त्यावर आकर्षक ऑफर्सही आहेत. या एक्स्पोत पर्यटकांना आमच्या विविध कस्टमाईज पॅकेजेसची निवड करता येईल.
- अखिलेश जोशी, संचालक, गिरिकंद ट्रॅव्हल्स