Rani Mukerji Opens Up About Miscarriage: बॉलिवूड दिवा राणी मुखर्जीचा मर्दानी 3 हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून राणी मुखर्जीचा फिअरलेस अवतार पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच होताच प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तिनं आपल्या आयुष्यात बऱ्याच कठीण काळाचा सामना केलाय. राणीनं वैयक्तिक आयुष्यातही बरेच दु:ख पचवले आहेत. तिला चित्रपटातून कायम दु:खाला सामोरे जाण्यास बळ मिळाले आहे. एकेकाळी राणीवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तिचा दुसर्या प्रेग्नंसीवेळी गर्भपात झाला होता. दरम्यान, फक्त चित्रपटामुळे तिला या संकटकाळातून बाहेर पडण्यास मदत झाली, असं अभिनेत्री सांगते.
एका मुलाखतीत राणी म्हणाली, "मी नेहमी असे चित्रपट निवडते, जे प्रभावी असतील. मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे हा चित्रपट अशावेळी माझ्याकडे आला, जेव्हा माझे वैयक्तिक नुकसान झाले होते. 2023 साली हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला". हा चित्रपट राणीकडे तेव्हा आला, जेव्हा ती तिच्या दुसर्या मुलाच्या गर्भपाताच्या वेदनेतून जात होती, असं राणी म्हणते.
मुलाखतीत राणी म्हणाली, "मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटाच्या स्क्रीप्टने मी खूप प्रभावित झाले होते. या चित्रपटात एक आई आपल्या मुलापासून वेगळी होते, हे दाखवण्यात आलं आहे. त्या वेदनेशी ती कशी झुंज देते, हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे". राणीच्या मते, या भूमिकेमुळे केवळ तिचे दु:ख कमी झाले नाही, तर समाजातील खोल वास्तवही उलगडण्यास मदत झाली, असं राणी म्हणते.
View this post on Instagram
मुलाशिवाय आईचे नेमके काय हाल होते. आईच्या डोळ्यादेखत मुलाला घेऊन गेल्यावर त्या महिलेची काय हालत होते, हा अनुभव या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे. "एका आईची तळमळ नेमकी काय असते, हे मला या चित्रपटातून दाखवायचे होते", असं अभिनेत्री म्हणाली.
राणी मुखर्जी आणि तिचा पती आदित्य चोप्रा यांना आदिरा नावाची एक मुलगी आहे. आदिराचा जन्म 2015 साली झाला होता. राणीच्या मते, 2020 मध्ये तिच्या दुसऱ्या गर्भधारणेच्या पाचव्या महिन्यात तिचा गर्भपात झाला होता. यामुळे राणीला प्रचंड धक्का बसला होता. मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटातून तिला या दु:खातून बाहेर पडण्यास मदत झाली.