भर दिवसा होणार अंधार, 2026 चे पहिले सूर्यग्रहण थेट या दिवशी, पूर्ण भारतात…
Tv9 Marathi January 30, 2026 01:45 PM

2026 ला सुरूवात झाली असून लवकरच फेब्रुवारी महिन्याला सुरूवात होईल. फेब्रुवारी महिना अत्यंत खास राहणार आहे. कारण या महिन्यात 2026 चे पहिले सूर्यग्रहण दिसणार आहे. हे अत्यंत मोठे ग्रहण असून सूर्यग्रहणाबद्दल लोकांमध्ये कायमच आर्कषण बघायला मिळते. सूर्यग्रहणादरम्यान मोठे बदल होतात. सूर्याच्या भोवती अचानक काही गोष्ट घडतात, ज्या बऱ्यापैकी आपण प्रत्यक्षात डोळ्यांनी बघू शकतो. मात्र, कधीही सूर्यग्रहण हे थेट डोळ्यांनी बघण्याऐवजी गॉंगल किंवा  काही उपकरणांनी बघावे. सूर्यग्रहणाचा दिवस शास्त्रीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असतो. अनेक संशोधने यादरम्यान केली जातात. 2026 चे पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी 2026 रोजी दिसणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच नाही तर ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही ग्रहण महत्वाचे मानले जाते. ग्रहणाच्या कालावधीत वैज्ञानिकांकडून अनेक गोष्टींचे संशोधन यादरम्यान केले जाते.

17 फेब्रुवारी 2026 वर्षातील पहिले सूर्यग्रहण असणार आहे. विशेष म्हणजे हे ग्रहण अत्यंत खास असून दिवसा सूर्य पूर्णपणे काळा होईल आणि त्याच्या कडेचा भाग फक्त लाल असेल. हा नक्कीच एक वेगळा अनुभव राहणार आहे. सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर 17 फेब्रुवारी 2026 रोजी काही प्रमाणात अंधार होईल. कारण सूर्य काळा होईल, फक्त कडेच्या बाजूचाच प्रकाश पडेल.

काही सेकंद ही स्थिती कायम राहणार आहे आणि त्यानंतर सुर्याचा नेहमीप्रमाणे प्रकाश पडेल. हा एक वेगळा आणि मोठा अनुभव ठरणार आहे. प्रत्येकाला याबद्दल उत्सुकता आहे की, सुर्याचा प्रकाश कसा कमी होईल आणि तो परत आपल्या मूळ स्थितीत कसा येईल. हे सूर्यग्रहण काही सेकंद असेल पण यादरम्यान अनेक गोष्टी अनुभवता येतील.

भारतातही या ग्रहणाबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ नक्कीच बघायला मिळत आहे. मात्र, हे ग्रहण भारतात दिसणार की नाही? याबाबत बऱ्याच लोकांना माहिती नाही. हे ग्रहण दक्षिण आफ्रिका, अंटार्क्टिका, अर्जेंटिना आणि चिली याच देशांमध्ये दिसणार आहे. या ग्रहण भारतात दिसणार नाही. मात्र, असे असले तरीही या ग्रहणासंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ आपल्याला नक्कीच बघायला मिळतील.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.