सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात स्थान द्यावे नरहरी झिरवळ यांचे विधान
Webdunia Marathi January 30, 2026 01:45 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंबीर नेतृत्व अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या दु:खद घटनेनंतर आता पक्षाची धुरा आणि भविष्यातील वाटचालीबाबत चर्चा सुरू झाली असून, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.ते म्हणाले, सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात स्थान द्यावे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहे.आता वेगळं राहून चालणार नाही.अशी जनतेची इच्छा आहे.

ALSO READ: सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या नवीन उपमुख्यमंत्री होतील का? फडणवीस यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी याबाबत संकेत दिले

सुनेत्रा वहिनींना आता मंत्रिमंडळात स्थान द्यावे. ही केवळ राजकीय गरज नसून सर्व कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा आहे.” दादांच्या पश्चात कुटुंबातील सक्षम नेतृत्वाने जबाबदारी स्वीकारावी, असा सूर कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे.

अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याचे संकेत झिरवळ यांनी दिले आहेत. “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आता एकत्र आल्याच आहेत. त्यांच्या या विधानामुळे शरद पवार आणि अजित पवार समर्थक पुन्हा एका छताखाली येण्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे.

ALSO READ: विमान वाहतूक मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून अपघाताच्या चौकशीत सहकार्य मागितले

अजित पवारांच्या निधनामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. अशा वेळी सुनेत्रा पवार यांनी खंबीरपणे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

नरहरी झिरवळ यांनी ही मागणी लावून धरल्याने आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

Edited By - Priya Dixit

ALSO READ: अजित पवार यांच्यानंतर महाराष्ट्राच्या सत्तेच्या खुर्चीवर कोण येणार? प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे की सुनेत्रा पवार - उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नावं पुढे येत आहे


© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.