Chanakya Niti : चाणक्य अंहकाराला का मानतात माणसाचा सर्वात मोठा शत्रू? शेकडो वर्षांपूर्वीच सांगितलंय
Tv9 Marathi January 30, 2026 12:45 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचावंत होते, अर्थतज्ज्ञ होते तसेच ते कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात माणसाचे जसे बाहेर शत्रू असतात, आणि अशा शत्रूपासून माणसाला धोका असतो, तसेच अनेक शत्रू आपल्या स्वत:मध्ये असतात. बाहेरचे शत्रू आपणं सहज ओळखू शकतो, त्यामुळे आपण त्यांच्यापासून सावध राहतो, मात्र जे तुमच्या आत शत्रू आहेत, ते तुम्हाला कधीच कळत नाहीत, त्यामुळे असे शत्रू तुमचं मोठं नुकसान करतात. उदाहरण द्यायचं झालं तर आळस, आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे. कारण या जगात कष्टाशिवाय पर्याय नाही, तुम्ही जर कष्ट केले तरच तुमच्याकडे पैसा येणार आहे, आणि तुमच्याकडे जर पैसा असेल तरच जगात तुम्हाला मान-सन्मान मिळतो. मात्र जो आळस करतो, त्याचं भविष्यात फार मोठं नुकसान होतं. आळस जसा माणसाचा शत्रू आहे, तसाच किंवा त्याहीपेक्षा माणसाचा मोठा शत्रू अंहकार असल्याचं चाणक्य यांनी म्हटलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

चाणक्य म्हणतात अंहकारा इतका मोठा शत्रू माणसाचा कोणताही नाही, जेव्हा तुमच्या मनात अंहकार निर्माण होतो, तेव्हा तुमच्या प्रगतीचे सर्व मार्ग बंद होतात. कारण जेव्हा तुमच्या मनात अंहकार निर्माण होतो, तेव्हा तुम्ही स्वत:ला सर्वज्ञानी समजू लागतात. त्यामुळे तुम्ही कधीही नवीन गोष्ट शिकत नाहीत. परिणामी तुम्ही जगात मागे राहून जातात. भविष्यात त्यामुळे तुमचं प्रचंड नुकसान होतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

चाणक्य पुढे म्हणतात जेव्हा तुमच्या मनामध्ये अंहकार निर्माण होतो. तेव्हा तुम्ही इतरांना तुमच्यासमोर कमी माण्यास सुरुवात करतात, तुम्ही स्वत:ला श्रेष्ठ समजतात. त्यामुळे अशा स्थितीमध्ये तुमचे मित्र, हितचिंतक, नातेवाईक हे तुमच्यापासून दुरावतात. याची फार मोठी किंमत तुम्हाला भविष्यात मोजावी लागते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

तसेच जेव्हा तुमच्यामध्ये अंहकार निर्माण होतो, तेव्हा तुम्ही सारासार विचार करण्याची क्षमता गमावून बसतात, अनेकदा चुकीचे निर्णय घेतात, त्याचा फटका तुम्हाला भविष्यकाळात बसतो, असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.