दिलासादायक! चांदी-सोन्याच्या दरवाढीला ब्रेक; सोन्याच्या दारात 10,500 रुपयांची घसरण, उच्चांक गाठल्यानंतर चांदीचा भावही घसरला
एबीपी माझा वेब टीम January 30, 2026 02:13 PM

Gold Silver Rate : चांदी-सोन्याच्या दरानं विक्रमी इंची गाठली आहे. जानेवारीत सोन्यानं (Gold) दीड लाखाचा टप्पा ओलांडला असताना सोन्याच्या दारात सातत्याने वाढ (Gold Silver Rate) होताना दिसत आहे. मात्र, दीड लाखांवर गेलेलं सोनं आता कमी होईल, नंतर कमी होईल अशी अपेक्षा बाळगून असलेल्या ग्राहकांना सोन्याच्या दराने गुरुवाररी आणखी एक धक्का दिलाय. कारण, काल (29 जानेवारी) सोन्याच्या (Gold) दरात एकाच दिवसांत तब्बल 14 हजार रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सोन्याचे दर हे 1 लाख 82 हजारांवर पोहोचले होते. तर चांदी (Silver) प्रति किलो 4 लाख रुपयांवर विक्री केली जात होती. असं असताना सोने आणि चांदीच्या किमती बाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

चांदीच्या किमती जवळपास 23,000 रुपयांनी घसरल्या (Gold Silver Rate Fell)

सतत वाढत असलेल्या सोन्याच्या दारात आज (30 जानेवारी) सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या किमती 10,500 रुपयांनी घसरल्या आहेत. तर एमसीएक्सवर चांदीच्या किमती जवळपास 23,000 रुपयांनी घसरल्या आहेत. एकंदरीत सोने आणि चांदी दोन्हीचे दर 0.6 टक्क्यांनी घसरल्या आहेत.

सोन्याचा आजचा भाव - ₹1,59,250 - प्रति 10 ग्रॅम

चांदीचा आजचा भाव - ₹3, 75, 900 - प्रति किलो

चांदीचा भाव

ग्रॅम    आजचा(30 जाने)   कालचा (29 जाने)        बदल
1           ₹395                            ₹410                  ₹15
8           ₹3,160                         ₹3,280               ₹120
10         ₹3,950                         ₹4,100               ₹150
100       ₹39, 500                      ₹41,000             ₹1,500
1000    ₹3,95,000                     ₹4,10,000           ₹15,000

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.