अकोला महापालिकेच्या उपमहापौरपदी भाजपाचे अमोल गोगे विजयी. काँग्रेसच्या आजाद खान यांचा केला 45 विरुद्ध 32 मतांनी पराभव. उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही एमआयएम राहिली तटस्थ. एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी घेतला नाही मतदान प्रक्रियेत भाग. अकोला महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांवर भाजपचे उमेदवार विजयी. अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवडीनंतर सभागृहात झाला राडा.
काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला सभागृहात केला राडा. एमआयएम आणि काँग्रेसचे नगरसेवक सभागृहात एकमेकांसोबत शाब्दिक भिडले..
भाजपचे शारदा खेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा केला 45 विरुद्ध 32 मतांनी केला पराभव. दरम्यान, एमआयएम आणि काँग्रेस नगरसेवक एकमेकांसोबत भिडले. MIM चे 3 नगरसेवक ऐनवेळी तटस्थ राहिल्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांसोबत वाद घातलाय..
दरम्यान, भाजपच्या महापौरला 38 नगरसेवकांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1, शिंदेंच्या शिवसेनेचा 1, आणि 2 अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा. काँग्रेसच्या आघाडीत गेलेले भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी ऐनवेळी दिला होता भाजपला पाठिंबा.
दुसरीकडं एमआयएमचे 3 नगरसेवक ऐवेळी राहिले तटस्थ. महापालिकेत चमत्काराचा काँग्रेसने केलेला दावा ठरला फोल. बहुमत मिळालेलं नसतानाही भाजपने मित्र पक्षांच्या साथीने राखली महापालिकेवरील सत्ता. भाजपाच्या कूटनीतीचा अकोला महापालिकेत मोठा विजय.