Maharashtra Cabinet Reshuffle: मंत्रिमंडळात फेरबदलाची मोठी चर्चा; अर्थ, ऊर्जा, गृह खात्याला नवीन चेहरा? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?
admin January 30, 2026 03:25 PM
[ad_1]

Maharashtra Cabinet Reshuffle: हा बुधवार, राज्यासाठी धक्कादायक ठरला. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजितदादा पवार हे भीषण विमान अपघातात हिरावले गेले. त्यानंतर आता राज्याचा आगामी अर्थसंकल्प कोण सादर करणार याची चर्चा होत आहे. तर अजितदादा पवार यांच्या जागी सुनेत्रा पवार यांचे नाव आघाडीवर आले आहे. तर राष्ट्रवादीची खाती आणि मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा ही सुरू झाली आहे. याप्रकरणी मोठ्या घाडमोडी घडत आहे. यासोबतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्रि‍करणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

छगन भुजबळ वर्षावर

दरम्यान मंत्री आणि राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी नुकतेच दाखल झाले आहेत. ते फडणवीस यांची भेट घेणार आहे. या भेटीत मंत्रिमंडळातील बदल आणि उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नावाची चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादीकडील खात्यांबाबतही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता

अजित पवारांच्या निधनानंतर एकीकडे मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीची खाती ही इतर नेत्यांना सोपविण्याचा निर्णय होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असलेली खाती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांकडे देण्यात यावी यासंदर्भातील पत्र आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. या नंतर आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रि‍करणावर निर्णय

या घाडमोडी घडत असतानाच दुसरीकडे पक्ष एकत्रित करण्याबाबतचा लवकरच अंतिम निर्णय पवार कुटुंब एकत्र बसून घेणार आहे. दोन्ही पक्ष एक करण्याबाबत आज किंवा उद्या पवार कुटुंबिय एकत्रित बसून निर्णय घेण्याची शक्यता शरद पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्ष एकत्रित करण्याच्या आधीच्या चर्चेत केवळ अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तर शरद पवारांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे, स्वत: शरद पवार, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे सहभागी होते. अजित पवार नसल्यामुळे आता पवार कुटुंबीय एकत्रित बसून निर्णय घेणार आहेत.

विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

कोणाला काय द्यावं, कोणाला काय देते, याचे उत्तर माझ्याकडे नाही. पण एक आहे की भाजपला सगळंच पाहिजे आहे. आता जी व्यवस्था आहे , ती ठेवावी लागते म्हणून नाहीतर भाजपने शिंदे सेना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांना बिन खात्याचे मंत्री करून टाकले असते. मुख्यमंत्र्याकडे ऊर्जा, होम, जीएडी अशी मोठं मोठी खाती आहेत आणि महाराष्ट्रभर त्यांना दौरे हे करावे लागतात, निवडणूक प्रचारात सर्वाधिक मुख्यमंत्री फिरतात. निवडणूक जिंकण्यासाठी देशात नरेंद्र मोदी फिरतात आणि राज्यात निवडणुकीत मुख्यमंत्री दौरे करतात. राज्यात कायदा सुव्यवस्थेची काय स्थिती निर्माण झाली ते आपण पाहतो. सगळ्या घटना हेच सांगतात की यामध्ये व्यवस्था संपूर्ण कोलमडली आहे, अशी टीका त्यांनी केली.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही जनभावना

अजित दादांच्या दुखद घटनेपासूनच कोणीही सावरलेला नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही जनभावना सुद्धा आहे, आणि दोन्ही पक्षाच्या वतीने त्याबाबतचे प्रयत्नापूर्वीसुद्धा झालेले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून राजेश टोपे यांनी असं विधान केलं आहे. शरद पवार, सुनेत्रा पवार, सुनील तटकरे यांनी याविषयीचा निर्णय घ्यावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. दादा हयात असताना आमच्या ज्या बैठका झाल्या त्यात त्यांची इच्छा होती की एकत्र यावं.त्या अनुषंगाने त्यांनी बऱ्याचदा आम्हाला बोलवून दाखवलं. एकत्र येणे दोन्ही पक्षाच्या दृष्टीने जास्त योग्य आहे, असे टोपे म्हणाले.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.