Mardaani 3: राणी मुखर्जी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रावच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर परतणार आहे. राणीचा चित्रपट, मर्दानी ३, शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.त्यामुळे अॅडव्हान्स बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मर्दानी आणि मर्दानी २ हिट झाल्यानंतर आता या चित्रपटाचा तिसरा भाग कसा असेल हे जाणून घेऊयात.
अॅडव्हान्स तिकीट बुकिंगमधून चित्रपटाने किती कमाई केली?
स्टेकनिकच्या अहवालानुसार, चित्रपटाने ब्लॉक बुकिंगसह २.३३ कोटी कमावले. तर मर्दानी ३ पहिल्या दिवशी ३ कोटींपर्यंत कमावेल अशी अपेक्षा आहे. तर, चित्रपट पहिल्या आठवड्याच्या शेवटी ११-१३ कोटी कमावेल असा अंदाज लावण्यात येत आहे. तसेच, मर्दानी ३ एकूण ६०-७० कोटी कमावेल.
Shahrukh Khan: चष्मा काढायला लावला, आयडी बघितला...; एयरपोर्टवर किंग खानची झाली चेकिंग, नेमकं कारण काय?पहिल्या दोन भागांची पहिल्या दिवशीची कमाई
मर्दानीच्या पहिल्या भागाने पहिल्या दिवशी ३.४० कोटी आणि जगभरात एकूण ५९.३० कोटी कमावले. दरम्यान, मर्दानी २ ने पहिल्या दिवशी ३८ दशलक्ष आणि जगभरात ६७ दशलक्ष कमावले. आता लवकरच मर्दानी ३ किती कोटींची कमाई करण्यात यशस्वी होईल हे लवकरच कळेल.
Actress Fraud Case: प्रसिद्ध अभिनेत्रीवर ११.५ कोटींच्या फसवणुकीचा आरोप; मुंबई पोलिसांनी केला गुन्हा दाखलView this post on InstagramA post shared by Rani Mukherjee Chopra (@ranimukherjeefp)
मर्दानी ३ चित्रपट
अभिराज मिनावाला दिग्दर्शित आणि आदित्य चोप्रा निर्मित ‘मर्दानी 3’ हा चित्रपट सामाजिक विषयांवर आधारित आहे. या चित्रपटात राणी मुखर्जीसह या खलनायिकेची भूमिका साकारत आहेत अभिनेत्री मल्लिका प्रसाद आणि अभिनेत्री जानकी बोडीवाला या चित्रपटात दिसणार आहेत.