Om Raje Nimabalkar: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळं अवघा महाराष्ट्र सध्या शोकाकूल आहे. त्यातच आता झेडपी आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा प्रचार कार्यक्रमही सुरु आहे. पण या प्रचाराबाबत धाराशीवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मोठा निर्णय घेत महत्वाचं आवाहन केलं आहे. जिल्ह्यातील निवडणुका ठाकरेंची शिवसेना आणि मित्रपक्षांच्यावतीनं राजेनिंबाळकरांच्या नेतृत्वाखाली लढल्या जात आहेत.
Ajit Srushti: अजितदादांच्या आठवणी जपणारी ‘अजित सृष्टी’ पिंपरी-चिंचवडमध्ये साकारणार; महेश लांडगेंची घोषणाट्विटरवर त्यांनी याबाबत पोस्ट केली आहे. यात राजेनिंबाळकर म्हणतात, "सविनय आवाहन! महाराष्ट्राच्या विकासासाठी सदैव आग्रही असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या धक्कादायक निधनाने धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. याच दुःखद परिस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचाराच्या अनुषंगाने माझे सर्व सहकारी, मित्रपक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व उमेदवार यांना सविनय विनंती आहे की प्रचार करताना कोणत्याही प्रकारचे हार, तुरे, सत्कार, वाजंत्री, बँड, हलगी, फटाके टाळून निवडणुकीची प्रचार यंत्रणा साध्या पद्धतीने राबवावी. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेल्या न भरून निघणाऱ्या नुकसानीचे भान व जाण ठेवूनच ही निवडणूक लढवावी, ही नम्र विनंती"
दरम्यान, अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघातात निधन झालं. त्यांच्यासह विमानातून प्रवास करणारे इतर चार जणांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. यामध्ये त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, मुख्य पायलट कॅप्टन सुमीत कपूर, सहपायलट शांभवी पाठक, फ्लाइट अटेंडंड पिंकी माळी यांचा समावेश होता. या विमान अपघाताची आता चौकशी केली जाणार आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच राज्य शासनानंही सीआयडीमार्फत याची चौकशी सुरु केली आहे.