Angarak Yog 2026: सर्व ग्रह वेळोवेळी भ्रमण करतात, यामुळे शुभ आणि अशुभ योग निर्माण होतात. जे सर्व राशींवर परिणाम करतात. त्यापैकी अंगारक योग आहे, जो ज्योतिषशास्त्रात तणाव आणि नकारात्मतेचे प्रतीक मानला जातो. फेब्रुवारीमध्ये तो तयार होण्याची अपेक्षा आहे. यामुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजून ३३ वाजता मंगळ कुंभ राशीत भ्रमण करेल. राहू आधीच या राशीत स्थित असेल. यामुळे मंगळ आणि राहूची युती होईल, यामुळे अंगारक योग निर्माण होईल. या योगामुळे मानसिक अशांतता वाढू शकते. याचा १२ राशींपैकी कोणत्या राशींवर परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया.
सिंहया राशीच्या लोकांनी निष्काळजीपणा टाळावा. कारण धोका निर्माण होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायात अति आत्मविश्वास समस्या निर्माण करु शकतो. घर आणि काम यांच्यात संतुलन राखणे आव्हानात्मक ठरु शकते. तसेच नवीन प्रवास करणे टाळावा. अपेक्षेपेक्षा जास्त खर्च करु नका. तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुमची निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत असेल.
Vastu Tips: वास्तुशास्त्राचा इशारा! ‘या’ गोष्टी घडल्यास लवकरच येऊ शकते आनंदाची बातमी मीनमीन राशीच्या लोकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा. गाडी चालवताना सावधगिरी बाळगावी. कोणतेही महत्वाचे निर्णय लगेच घेण टाळावे. नोकरी करणाऱ्यांना विरोध होऊ शकतो. आदर कमी झाल्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर परिणाम होईल आणि भूतकाळातील समस्यांबद्दल दुख वाटू शकते.
मेषमेष राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागेल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता कमी आहे. तुम्हाला धीर धरावा लागेल. या राशीच्या लोकांना आत्मविश्वासाचा अभाव जाणवू शकतो. कामाचा विस्तार करण्याची चिंता अशेल आणि कुंटूबातील सदस्याकडून कमी पाठिंबा मिळू शकेल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मोठ्यांचा सल्ला घ्यावा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.