Ireland Paul Stirling world record Most T20I appearances in men’s cricket : आयर्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने इतिहास रचला आहे. तो ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे. स्टर्लिंगपूर्वी हा विक्रम माजी भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावावर होता, ज्याने भारतीय संघासाठी १५९ ट्वेंटी-२० सामने खेळले होते. पण, गुरुवारी संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध मैदानावर उतरून, स्टर्लिंगने हा विश्वविक्रम नावावर केला आहे. त्याने आयर्लंड क्रिकेट संघासाठी १६० ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत.
३५ वर्षीय पॉल स्टर्लिंगने १६० ट्वेंटी-२० सामन्यांत १५७ डावांमध्ये ३८७४ धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि २४ अर्धशतके झळकावली आहेत. १५५ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने गोलंदाजीत ४१ डावांमध्ये ३२.३५ च्या सरासरीने २० विकेट्स घेतल्या आहेत. २१ धावांत तीन विकेट्स, ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.
यूएईविरुद्धच्या या ऐतिहासिक सामन्यात स्टर्लिंगला काही खास कामगिरी करता आलेली नाही. तो ३ चेंडूंत ८ धावा करून माघारी परतला. रॉस एडर ( ३९), लॉर्कन टकर ( ३८), कर्टीस कॅम्फर ( २५), बेन कॅलिट्ज ( २६) व जॉर्ज डकरेल ( २२) यांनी संघाला ६ बाद १७८ धावांपर्यंत पोहोचवले.
यूएईचा संपूर्ण संघ १९.५ षटकांत १२१ धावांत तंबूत परतला. आयर्लंडच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. यूएईकडून सलामीवीर व कर्णधार मुहम्मद वसीमने सर्वाधिक ४० धावा केल्या. दुसरा सलामीवीर आर्यांश शर्माने २३ धावा केल्या, परंतु त्या दोघांशिवाय इतर फलंदाज ढेपाळले. मॅथ्यू हंम्परेस् व गॅरेथ डेलनी यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
बाजूला व्हा... नो फोटो प्लीज! Sanju Samson साठी सूर्यकुमार बनला अंगरक्षक; केरळमध्ये पोहोचताच असा का वागला? Video Viralट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आयर्लंडच्या संघाला ब गटात ऑस्ट्रेलिया, ओमान, श्रीलंका व झिम्बाब्वे यांचा सामना करायचा आहे. ८ फेब्रुवारीला त्यांचा पहिला सामना श्रीलंकेशी होईल. त्यानंतर ऑस्ट्रेलिया ( ११ फेब्रुवारी), ओमान ( १४ फेब्रवारी) आणि झिम्बाब्वे ( १७ फेब्रुवारी) अशा लढती होतील.