NCP Merger Meeting Video: गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीवरून अंतर्गत पातळीवर चर्चा सुरु होत्या, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. इतकेच नव्हे, तर 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाची घोषणा होणार होती, अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली. याच महिन्यात 17 जानेवारी रोजी गोविंदबागेत शरद पवार यांच्या उपस्थित दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा झाली होती. या चर्चेत राष्ट्रवादीकडून केवळ अजित पवार दिसून येत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना शरद पवार यांनी आपल्याला काहीच माहीत नाही, तर आपण काय बोलणार? अशी प्रतिक्रिया दिल्याने सुद्धा राजकीय भूवया उंचावल्या आहेत. दरम्यान, निर्णय घेण्यासाठी इतकी घाई का केली जात आहे अशी विचारणा सुद्धा शरद पवार यांनी केला. या निर्णयामागे सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल असावेत, असं शरद पवार यांनी सांगितल्याने सुनेत्रा पवार यांनी कोणतीच चर्चा केली नव्हती, असेच शरद पवार यांच्या वक्तव्यातून सूचित होत आहे. नरेश अरोरा कोण यांना मी ओळखत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, आमच्या नव्या पिढीला पुढे आणलं जाईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या ही चर्चा 4 महिने सुरू होती. याची जबाबदारी अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यावर होती. मात्र, अपघात झाला आणि यात खंड झाला. आमच्या पक्षात आणि त्यांच्या पक्षात एकत्र काम करण्याचं एकमत होतं. हा निर्णय 12 तारखेला जाहीर करायचा होता. ही तारीख अजितदादा यांनी दिली होती. दोन्ही पक्षात सकारात्मक चर्चा होती, पण अचानक ही घटना झाली. दादांची इच्छा होती ती इच्छा पूर्ण व्हावी अशी सुद्धा आमची इच्छा असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, या परिस्थितीला आता सामोरे जावं लागेल. लोकांचं दुःख कमी करण्यासाठी आम्हाला लोकांची कामं करावे लागतील. नव्या पिढीची ही जबाबदारी जास्त आहे. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, कुठलीही चर्चा आमच्याकडे झालेली नाही. मुंबईत या संदर्भात चर्चा झाली असावी.
इतर महत्वाच्या बातम्या