पिंपरी : पिंपरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तडीपार गुंडाकडून होत असलेल्या सततच्या त्रासामुळे (Pune Crime News) एका टपरी चालक महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. महिलेने गुरुवारी (दि २९) पोलिस आयुक्त कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा (Pune Crime News) प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी महिलेवर चिंचवडमध्ये, तर तिला त्रास देणाऱ्या गुंडावर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime News)
या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता सागर लांडगे (वय ५०, लांडेवाडी, भोसरी) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेच्या विरोधात पोलिस अंमलदार मोनिका जरे यांनी चिंचवड पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे, तर तया महिलेला त्रास देणाऱ्या सचिन डॅनियल खलसे (४०, लांडेवाडी, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.(Pune Crime News)
आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या अनिता लांडगे यांची लांडेवाडी येथे ममता नावाची पानटपरी आहे. खलसे हा टपरीवर आला. त्याने टपरीतून घेतलेल्या सिगारेट, पाण्याच्या बाटलीचे लांडगे यांनी पैसे मागितले असता तो चिडून गेला. 'तुला जर पानटपरी चालवायची असेल, तर प्रत्येक महिन्याला ५०० रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर तुझी टपरी जाळून टाकीन (Pune Crime News) आणि तुला मारून टाकीन,' अशी धमकी दिली. याबाबत अनिता लांडगे यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांच्या कारवाई केल्यानंतरही तो महिलेला त्रास देत होता. गुरुवारी सकाळी महिला पोलिस आयुक्त कार्यालयासमोर ती महिला आली. तिने सोबत ज्वलनशील पदार्थ असलेली बाटली आणली होती. पोलिसांनी आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. त्यानंतरही तिने ज्वलनशील पदार्थ स्वतःच्या अंगावर ओतून घेत, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती.(Pune Crime News)
तर याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जामदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आणि संशयिताचे पूर्वीपासूनच वाद आहेत. महिलेच्या तक्रारीनुसार आम्ही खलसेवर प्राथमिक कारवाई केली होती. खलसेने पुन्हा त्रास दिल्याबाबत फिर्यादीने कोणतीही तक्रार दिली नाही. त्यांनी थेट आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजले. मात्र, त्यांनी नव्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, खलसेवर खंडणीचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.