सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार… शरद पवारांना कल्पनाच नाही…., बारामतीत शुक्रवारी रात्री काय घडलं?
Tv9 Marathi January 31, 2026 10:46 PM

Ajit Pawar plane crash: राज्याचे उपमुख्यमंत्री शरद पवार यांनी 28 जानेवारी 2026 रोजी अखेरचा श्वास घेतला. मुंबईहून बारामतीला सभेला जात असताना अजित पवार याच्या विमानाचा अपघात झाला आणि या दुर्दैवी अपघातात दादांनी अखेरचा श्वास घेतला. अजित पवार यांच्या निधनाला अद्याप तीन दिवस देखील पूर्ण झाले नाहीत तर, दुसऱ्या बाजूला राज्याच्या राजकारणातील हलचालींनी वेग घेतला आहे. बुधरवारी अजित पवार यांचं निधन झालं आणि गुरुवारी त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. तर शुक्रवारी राख सावडली आणि सुनेत्रा पवार रात्री मुंबईत आल्या. आता शनिवारी म्हणजे आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती देखील समोर आहे. अशात शुक्रवारी बारामतीत काय झालं? याबद्दल जाणून घ्या.

सांगायचं झालं तर, बारामतीत शुक्रवारी रात्री मोठ्या हलचाली घडलेल्या दिसून आल्या. त्यानंतर आता राज्यातील राजकारणाचं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री कुटुंबियांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत कोण उपमुख्यमंत्रीपदावर बसेल यासाठी नाव ठरवण्यात येणार असल्याची शक्यता होती. पण बैठकीला उपस्थित न राहाता सुनेत्रा पवार, पुत्र पार्थ पवार आणि जय पवार हे मुंबईला रवाना झाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यापूर्वी शरद पवार यांना कोणतीच कल्पना दिली नाही किंवा त्यांच्याकडून कोणताच सल्ला घेतला नाही. यामुळे कुटुंबिय सुनेत्रा पवार यांच्यावर नाराज आहेत. तर समोर येत असलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आजचे कार्यक्रम रद्द केले असून शपथविधीसाठी संध्याकाळी उपस्थित राहणार आहेत. लोकभावनात सायंकाळी 5 वाजता होणार सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

काय म्हणाले शदर पवार?

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार यावर आज शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासा केला. ‘सुनेत्र पवार यांच्यासोबत आमची कोणतीही चर्चा झालेली नाही… शपथविधी आहे हे देखील आम्हाला माहिती नाही.. पटेल तटकरे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या पक्षाने काय करावं हा त्यांचा अधिकार आहे…’ असं देखील शरद पवार म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.