बलुचिस्तानात बंडखोरांचा एकाच वेळी १२ शहरांवर कब्जा, अनेक पोस्ट सोडून पाक सैनिक पसार
GH News February 01, 2026 12:11 AM

पाकिस्तानच्या बलुचिस्तानात बलुच बंडखोरांनी हंगामा केला आहे. बलुच लिब्रेशन आर्मीने बलूचीस्थान प्रांच अनेक शहरांमध्ये एकसाथ हल्ला केला आहे. अनेक ठाण्यांवर सरकारी इमारतींवर कब्जा केला आहे. शनिवारी बलुचीस्थानात बलुच बंडखोरांनी विशेष म्हणजे बलोच लिबरेशन आर्मी (BLA) च्या जेयंद गटाने “ऑपरेशन हेरॉफ” च्या फेज 2 अंतर्गत मोठ्या प्रमाणावर हल्ले केले आहेत. बंडखोर बलुचांनी अनेक पोलिस ठाण्यांवर कब्जा केला आहे. बलुच बंडखोरांच्या अचानक हल्ल्याने बॅकफूटवर गेलेल्या पाकिस्तानी फौजेला त्यांच्या पोस्ट सोडून पळावे लागले आहे.

पाकिस्तानच्या जिओ न्यूजच्या मते या हल्ल्यात आतापर्यंत १० सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला आहे. जर पाकिस्तानी सरकारने दावा केला आहे की ५८ अतिरेकी ठार झाले आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी सुरक्षा दलांनी सरकारी सुविधा आणि अन्य टार्गेटवर लक्ष केंद्रीत केले आहे.हे हल्ले मोठे मानले जात आहेत. कारण १२ हून अधिक ठिकाणांना एकसाथ टार्गेट केले आहे.

रस्त्यांवर बंडखोर निघाले, अनेक शहरांवर कब्जा

बलुच बंडखोरांनी क्वेटा शिवाय पसनी, मस्तंग,नुश्की आणि ग्वादर जिल्ह्यात एकसाथ हल्ले केले. बंडखोर बंदूकांनी हल्ले करत असून अनेक ठिकाणी आत्मघातील हल्ले करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर स्थानिक पत्रकारांनी यासंदर्भात अनेक दावे केले आहे. एका पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार बलुचिस्तानात अनेक शहरात हत्यारबंद लोकांनी अनेक शहरांवर कब्जा केला आहे. मस्तुंगमध्ये बंडखोरांनी पोलीस ठाण्यावर आणि शहरांवर कब्जा केला आहे. ३० हून अधिक कैदी फरार आहेत. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटींवर अरब न्यूजला सांगितले की शहरात बंडखोरांनी शहरात घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी इतर कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या एजन्सीने त्यांना रोखले आहे.

त्यांनी सांगितले की बंडखोरांनी सरयाब रोडवर एका पोलिस मोबाईल व्हॅनवर हल्ला केला, ज्यात दोन पोलिस कर्मचारी ठार झाले. पोलिस आणि एजन्सीची क्वेटा शहरात बंडखोरांशी चकमक सुरुच असून अजूनही एक क्लीयरन्स ऑपरेशन सुरु आहे.

पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनच्या एका वार्ताहाराने दिलेल्या बातमीनुसार हल्ल्यानंतर क्वेटा, सिबी आणि चमन येथे मोबाईल फोन सर्व्हीस काम करत असली तर डेटा सर्व्हीस बंद करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री बख्त मुहम्मद काकर आणि आरोग्य सचिव मुजीबुर रहमान यांच्या आदेशाने संपूर्ण प्रातांत सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे.

दहा शहरात एकसाथ हल्ले सुरु

दि बलूचिस्तान पोस्टच्या वृत्तानुसार बलूच लिबरेशन आर्मीने शनिवारी त्यांचा कमांडर-इन-चीफ बशीर झेब बलूच याचा एक व्हिडीओ मॅसेज जारी केला आहे. यात त्याने बलुच लोकांना आपल्या घरातून बाहेर पडा आणि पाकिस्तानी सरकारच्या विरोधात सशस्र संघर्षाच्या त्यांच्या निर्णायक कारवाईत सामील होण्याचे आवाहन केले आहे. या हल्ल्याला त्याने निर्णायक हल्ला म्हटले आहे. “ऑपरेशन हेरोफ” च्या दुसऱ्या फेज अंतर्गत बलुचिस्तानच्या दहा शहरात एकसाथ हल्ले सुरु केले आहेत अशी घोषणा कमांडर-इन-चीफ बशीर झेब बलूच याने या व्हिडीओत केली आहे.

४८ तासांत ७० बंडखोरांचा खात्मा केल्याचा दावा

गेल्या दोन दिवसांत सुरक्षा दलांनी प्रांतात विविध ठिकाणी ७० हून अधिक बंडखोरांना ठार मारले असल्याचा दावा बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांचे राजकीय आणि माध्यम विशेष सल्लागार शाहिद रिंद यांनी एक्स वर पोस्ट करत केला आहे.

येथे पाहा पोस्ट –

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.