इशान किशन याने केलेलं शतक आणि त्यानंतर अर्शदीप सिंह याने घेतलेल्या 5 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडचा पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्यात 46 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 272 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडला 19.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 225 धावाच करता आल्या. भारताने अशाप्रकारे अंतिम सामन्यात विजय मिळवला. तसेच भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ही मालिका 4-1 अशा एकतर्फी फरकाने आपल्या नावावर केली.